
मुंबई – गणेशोत्सव मंडळांनी ‘ऑपरेशन सिंदूर’ किंवा ‘स्वदेशी’ या विषयांवर देखाव्यांच्या माध्यमातून जनजागृती करावी. मंडळांनी प्रशासनासोबत समन्वय ठेवून हा उत्सव शांततेने आणि उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करावा, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. गणेशोत्सवानिमित्त आयोजित केलेल्या कायदा-सुव्यवस्था आढावा बैठकीत ते बोलत होते.
त्यांनी सांगितले की,…
१. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी यावर्षीच्या गणेशोत्सवामध्ये भारताने जगाला ‘ऑपरेशन सिंदूर’द्वारे दाखवलेली शक्ती आणि स्वदेशी वस्तूंच्या वापराविषयी जनजागृती करावी.
२. गणेशोत्सव मंडळांनी प्रशासनासमवेत समन्वय ठेवून हा उत्सव शांतता आणि उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करावा.
३. गणेशोत्सवाला राज्यशासनाने राज्य महोत्सवाचा दर्जा दिला आहे. त्यामुळे हा महोत्सव साजरा करण्यासाठी शासनाने मोठ्या प्रमाणावर विस्तृत नियोजन केले आहे.
४. गणेशोत्सव मंडळांना मागील वर्षी दिलेल्या सर्व सवलती याही वर्षी कायम ठेवण्यात येतील. हा उत्सव साजरा करतांना कायद्याचे योग्य पालन करावे. ईद-ए-मिलाद सणही गणेशोत्सवाच्या कालावधीत येत असल्याने समन्वयाने धार्मिक सौहार्दता ठेवत कुठेही कायदा-सुव्यवस्था बिघडणार नाही, याची दक्षता घ्यावी.
सध्या ‘एआय’ कॅमेर्यावरून दंड आकारणार नाही
१ ऑगस्टपासून ‘म्हाजी बस योजना’ संपूर्ण गोव्यात लागू होणार
राज्यातील ६ शासकीय वैद्यकीय रुग्णालयांच्या जवळ उभारण्यात येणार सुसज्ज धर्मशाळा !
देहलीतील आंदोलनाच्या माध्यमातून अराजकता पसरवण्याचा प्रयत्न ! – देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री
आषाढी वारीसाठी पंढरपूर येथे जाण्यासाठी पुणे विभागातून ३५० अधिकच्या गाड्या !
पंढरपूर येथे यात्रेसाठी उभारलेला तात्पुरता मंडप कोसळला !