उद्याचा स्वातंत्र्यदिन

उद्या स्वातंत्र्यदिन, म्हणजे १० मे १८५७ या दिवशी प्रारंभ झालेल्या स्वातंत्र्ययुद्धाचा स्मृतीदिन ! स्वातंत्र्याचा स्मृतीदिन ! किती विसंगत आणि भेसूर कल्पना ही ! लक्षावधी देशभक्तांनी ज्यासाठी स्वत:चे रक्त सांडले, सहस्रो राष्ट्रविरांनी ज्यांच्याकरता आत्मार्पण केले, शेकडो हुतात्म्यांनी ज्याच्या प्राप्तीसाठी आपल्या सर्वस्वावर निखारा ठेवला, ते सत्य-शिव-सुंदर असे स्वातंत्र्य आपण गमावले. अनेक वर्षे उलटून गेली, तरी ते अजून आपण परत मिळवू शकलो नाही. याचे कारण ? एकच आपण एक सिद्धांत विसरलो. राष्ट्राची स्वातंत्र्ये परकियांना हिसकावून घेता येत नसतात, तर त्या त्या राष्ट्रांतील नागरिकच स्वार्थासाठी ते स्वातंत्र्य परकियांच्या पदरात टाकत असतात. मग त्या प्रसंगी घ्यावयास आलेल्याने आपली झोळी अधिक पसरली, तर त्यात नवल ते काय ?
जोपर्यंत समष्टी जीवनाची जाणीव होऊन राष्ट्रातील प्रत्येक घटक व्यक्तीने तद्नुसार आचरण करावयास प्रारंभ केला नाही, तोपर्यंत राष्ट्रीय स्वातंत्र्याच्या गप्पा फोल आहेत. जगावर अशा एकाही राष्ट्राचा उज्ज्वल इतिहास दाखवता येणार नाही की, जो समष्टी जीवनाच्या उदात्त ध्येयावर अधिष्ठित नाही. हिंदु समाजाचा विराट वृक्ष उन्मळून पडतो कि काय, अशी जी भयानक अवस्था प्राप्त झालेली आज आपण पहातो तिचे मूळ कारण एकच, आमच्यातील समष्टी जीवनाचा अभाव ! वैयक्तिक तामस स्वार्थापासून संस्थागत सात्त्विक स्वार्थापर्यंत जो जो फुटीरपणा तो तो समष्टी जीवनाला विघातक, अतएव राष्ट्रीय कल्याणाला मारक ठरला. याची उदाहरणे हिंदु साम्राज्याच्या अंतकालापासून कालपर्यंत घडली; दुर्दैवाने आजही घडत आहेत.
(साभार : ग्रंथ ‘अज्ञाताची वचने,’ संचालक : श्री. अमरेंद्र गाडगीळ)
नव्या ‘ग्रेट गेम’च्या (राजकीय डावपेचांच्या) केंद्रस्थानी बीजिंग
भारत आधीपासून जे आचरणात आणत होता, तेच पाश्चिमात्य देश आता शोधून काढत आहेत !
कर्नाटक येथील श्री श्री श्री वामनाश्रम स्वामीजी यांनी धर्माभिमान जागृत होण्यासाठी भक्तांना केलेले मार्गदर्शन आणि ‘सनातन संस्थे’च्या साधकांविषयी काढलेले कौतुकाद्गार !
फलकप्रसिद्धीच्या माध्यमातून कर्नाटक राज्यात झालेला प्रभावी धर्मप्रसार !
हिदु धर्माचा झेंडा !