De Silva India : भारताची थट्टा थांबवा, त्यानेच आपल्याला संकटकाळात साहाय्य केले !

  • भारतावरील अमेरिकेच्या आयात शुल्कावरून श्रीलंकेने भारताची थट्टा केल्याचे प्रकरण

  • श्रीलंकेचे खासदार हर्षा डिसिल्वा यांनी त्यांच्या देशातील नेत्यांना फटकारले !

श्रीलंकेचे खासदार हर्षा डिसिल्वा

कोलंबो (श्रीलंका) – भारतावरील अमेरिकेच्या आयात शुल्कावरून श्रीलंकेने भारताची थट्टा केल्याच्या प्रकरणी श्रीलंकेचे खासदार हर्षा डिसिल्वा यांनी ‘भारताची थट्टा थांबवा, त्यानेच आपल्याला संकटकाळात साहाय्य केले आहे’, अशा शब्दांत श्रीलंकेला घरचा अहेर दिला. हर्षा पुढे म्हणाले की, भारताला आशा होती की, अमेरिका आयात शुल्क न्यून करेल आणि हीच अपेक्षा श्रीलंकेलाही होती; परंतु श्रीलंकेचे काही नेते भारताविषयी उपरोधिक बोलत आहे. भारत हाच आपला खरा मित्र असून त्याच्या धैर्याने संपूर्ण आशियाला प्रेरणा मिळते.

वर्ष २०२२ मध्ये आर्थिक संकटात सापडलेल्या श्रीलंकेला भारताने सुमारे ५ अब्ज डॉलर्सचे (४ लाख ३८ सहस्र कोटी रुपयांचे) साहाय्य केले होते. त्यामध्ये औषधे, अन्न, इंधन, रोख कर्ज आदींचा समावेश होता. या काळात चीन किंवा इतर देशांनी फारसे साहाय्य केले नाही. अमेरिकेने श्रीलंकेच्या वस्तूंवर २० टक्के कर लादला आहे, जो ७ ऑगस्ट २०२५ पासून लागू झाला आहे.

संपादकीय भूमिका

भारताच्या साहाय्याची जाणीव नसणार्‍या आणि वर भारताचीच थट्टा करणार्‍या कृतघ्न देशांना यापुढे साहाय्य करायचे कि नाही ?, हे सरकारने ठरवले पाहिजे !