कर्मचार्यांच्या ९० टक्के मागण्या मान्य

शनिशिंगणापूर – १ ऑगस्ट २०२४ या दिवशी लागू केलेल्या वेतनश्रेणीत असलेल्या त्रुटी, महागाई भत्ता, कालबद्ध पदोन्नती आदींसह ८ मागण्या घेऊन शनिशिंगणापूर येथील ‘शनैश्वर देवस्थाना’चे कर्मचारी साखळी उपोषणास बसले होते. ९० टक्के कर्मचार्यांच्या मागण्या मान्य करून पूर्वी असलेल्या १४२ टक्के महागाई भत्त्यात १३ टक्क्यांच्या वेतनवाढीच्या आश्वासनानंतर उपोषण सोडण्यात आले. उपोषणकाळात शनिदेवाच्या दर्शनासाठी येणार्या भाविकांना या उपोषणास अडथळा येऊ नये; म्हणून १०० हून अधिक कर्मचारी साखळी उपोषणास, तर ५ कर्मचारी आमरण उपोषणास बसले होते.
| हिंदूंच्या मंदिराचे सरकारीकरण केल्याचे परिणाम ! देवस्थानामध्ये ‘सेवा’ असा भाव न ठेवता पैसे कमावण्यासाठीची व्यावसायिक नोकरी असा उद्देश ठेवल्याने मंदिरात ‘कर्मचारी’ म्हणून काम केले जाते, हे आंदोलनातून लक्षात येते. |
‘शनैश्वर देवस्थान’ चौकशीच्या फेर्यात !
मुंबई येथील धर्मादाय आयुक्तांकडून अनावश्यक कामगार भरतीची चौकशी, अहिल्यानगर येथील सायबर शाखेकडून ऑनलाईन ॲप दर्शन घोटाळा, देवस्थानाचे उपकार्यकारी अधिकारी नितीन शेटे यांची आत्महत्या आदी घटनांची चौकशी चालू असून ‘शनैश्वर देवस्थान’ चौकशीच्या फेर्यात अडकल्याचे दिसून येते.
संपादकीय भूमिकावेतनवाढीच्या स्वार्थापेक्षा मंदिरात भावपूर्ण सेवा केल्यास शनिदेवाची कृपा संपादन करता येईल ! |
खड्डे तक्रारीचे ‘पी.एम्.सी. रोड मित्र’ अॅप ४ महिन्यांपासून बंद !
कोस्टल रोडवरील बोगद्यात चारचाकीला आग; वाहने सोडून लोकांचे पलायन !
थोडक्यात महत्त्वाचे (दि : १६ .०७.२०२६)
श्री जगन्नाथदेवाची आध्यात्मिक गुणवैशिष्ट्ये !
एन्.एम्.एम्.टी.च्या इलेक्ट्रिक बसला आग
श्री महालक्ष्मीदेवी मंदिराच्या जतन-संवर्धन कामात भारतीय पुरातत्वीय निकष आणि शास्त्रोक्त संवर्धन पद्धती यांचे काटेकोर पालन व्हावे ! – सकल हिंदु समाजाचे निवेदन