शिक्षण विभागाचा अभिनंदनीय निर्णय !

मुंबई – बालवयापासूनच शिस्त लागावी आणि त्यांच्यात देशाप्रती आदर निर्माण व्हावा, यासाठी ‘राष्ट्रीय छात्र सेने’च्या धर्तीवर इयत्ता १ लीपासून प्रशिक्षण देण्यात येणार आहे, अशी माहिती शिक्षणमंत्री दादाजी भुसे यांनी दिली. यासाठी राज्यात नवीन १० केंद्रे निर्माण केली जाणार असून २० सहस्र ३१४ विद्यार्थी यामध्ये जोडले जाणार आहेत. या पार्श्वभूमीवर ६ ऑगस्ट या दिवशी दादाजी भुसे यांची अधिकार्यांसमवेत बैठक झाली.
याविषयी अधिक माहिती देतांना दादाजी भुसे म्हणाले, ‘‘सद्यस्थितीत राज्यात १ सहस्र ७२६ शाळा आणि महाविद्यालये यांतील १ लाख १४ सहस्रांहून अधिक विद्यार्थ्यांना राष्ट्रीय छात्र सेनेचे प्रशिक्षण दिले जात आहे. यावर्षी स्वातंत्र्यदिनाच्या समारंभात देशभक्तीपर गीतांवर कवायती सादर केल्या जाणार आहेत. राज्यातील अधिकाधिक विद्यार्थ्यांना राष्ट्रीय छात्र सेनेचे प्रशिक्षण मिळावे, यासाठी प्रशिक्षण केंद्रे वाढवून मिळावीत, तसेच अधिक शाळांतील विद्यार्थी त्यात सहभागी व्हावेत, यासाठी प्रयत्न केले जातील. विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्यासाठी ‘माजी सैनिक कल्याण मंडळा’च्या साहाय्याने माजी सैनिकांचे साहाय्य घेण्यात येणार आहे.’’
हिंदु राष्ट्र समन्वय समितीच्या मागणीला शिक्षण खात्याचा सकारात्मक प्रतिसाद !
अनुमतीविना म्हादई वन्यजीव अभयारण्यात प्रवेश करणार्या ५ विद्यार्थ्यांविरुद्ध गुन्हा नोंद
शाळांमध्ये अतिरेकी आणि राष्ट्रविरोधी विचारसरणीला थारा नसावा ! – नितीन फळदेसाई
मुंबईत ‘डबेवाले’ बांधवांच्या सन्मानार्थ वैद्यकीय पडताळणी आणि पाद्यपूजा !
‘स्मार्ट मीटर’विषयीच्या अफवांवर विश्वास न ठेवता ग्राहकांनी सहकार्य करावे ! – महावितरणचे आवाहन
भारतात अवैधरित्या वास्तव्यास असलेला अमेरिकेचा माजी सैनिक कह्यात