राज ठाकरे यांनी केलेल्या टीकेचा परिणाम !

पनवेल – मनसेच्या संतापलेल्या कार्यकर्त्यांनी जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर कोन गावातील ‘नाईट रायडर’ या रात्री १२ नंतरही विलंबापर्यंत चालू असलेल्या लेडीज बारवर धडक दिली आणि काठ्या अन् दांडके घेऊन हा बार फोडला.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजधानी असणार्या रायगड जिल्ह्यात अनधिकृत डान्सबारच्या वाढत्या संख्येवर जोरदार टीका केली होती. ‘छत्रपतींच्या राजधानीमध्ये रात्री उशिरापर्यंत ‘डान्स बार’ कसे चालू रहातात ? अशा बारनी येथील तरुणांचे आयुष्य उद्ध्वस्त केले आहे’, असे राज ठाकरे पनवेलमधील सभेत म्हणाले होते. आर्.आर्. पाटील मुख्यमंत्री असतांना हे सूत्र गाजले होते. या बारमधून बाहेर पडणार्या अनेक तरुणांचे अपघातही झाले आहेत.
संपादकीय भूमिकाआतापर्यंत अनेकदा लेडीज बारचे सूत्र येऊनही पनवेल परिसरात रात्री विलंबापर्यंत लेडीज बार चालू असतात, हे सर्वांना ठाऊक असलेले सत्य आहे. आतापर्यंत शेकडो तरुणांचे आयुष्य ‘डान्स बार’ने उद्ध्वस्त केले आहे, हेही सत्य आहे. अनेक तरुण व्यसनी आणि कर्जबाजारी झाले आहेत, त्यांनी भूमी विकल्या आहेत. पोलीस भ्रष्ट असल्यानेच या बारवर कारवाई करत नाहीत, असेच खेदाने म्हणावे लागते ! |
‘एस्.एन्.डी.टी. महिला विद्यापिठा’च्या कारभाराची चौकशी होणार !
कचरा प्रकल्पाच्या निविदेचे शुल्क अल्प करण्याची महापालिका आयुक्तांची चेतावणी !
परभणी येथील संत कालिदास महाराज यांचे देहावसान
५ जणांना कापूरबावडी पोलिसांकडून समजपत्र !
नाशिकच्या जलसंवर्धन योजनेची राष्ट्रीय स्तरावर नोंद !
ठाणे येथे २५ वर्षांपासून गढूळ पाण्याचा पुरवठा; संतप्त नागरिकांचा महानगरपालिकेवर मोर्चा