उत्तरदायींवर तातडीने कारवाई करा ! – उच्च न्यायालयाचा आदेश
शिलाँग (मेघालय) – मेघालयच्या दक्षिण-पश्चिम खासी हिल्स जिल्ह्यातील राजाजू आणि डिएंगनागांव गावांतील सरकारी कोळसा डेपोंमधून (गोदामातून) तब्बल ४ सहस्र टन कोळसा गायब झाला. प्रकरणावर मेघालय उच्च न्यायालयाने तीव्र अप्रसन्नता व्यक्त करत उत्तरदायी अधिकार्यांवर तातडीने कारवाई करण्याचा आदेश दिला आहे. न्यायमूर्ती बी.पी. कटके यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आलेल्या अन्वेषण समितीने सादर केलेल्या अहवालात याला गंभीर प्रशासकीय अपयश ठरवले आहे.
🚨 4,000 tons of coal missing from a govt warehouse in Meghalaya!
⚖️ High Court orders strict action against the guilty.
😳 Meanwhile, Excise Minister Kyrmen Shylla (UDP) claims:"Maybe the coal was washed away in the rain!"
Unbelievable!#CoalScam
PC: @NortheastToday pic.twitter.com/LrgRj7n0aI— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) July 29, 2025
प्रशासनाने कोळसा गायब होण्याच्या घटनेची चौकशी चालू केली आहे; मात्र आजपर्यंत कोणत्याही अधिकार्यावर ठोस कारवाई झालेली नाही.
(म्हणे) ‘पावसात वाहून गेला असेल कोळसा ! – मंत्र्यांचा धक्कादायक दावा

या प्रकरणावर प्रतिक्रिया व्यक्त करतांना युनायटेड डेमोक्रॅटिक पार्टीचे नेते तथा मेघालयाचे उत्पादन शुल्क मंत्री किरमेन शायला यांनी स्पष्टीकरण देतांना म्हटले की, मेघालय हे देशातील सर्वाधिक पाऊस पडणारे राज्य आहे. त्यामुळे कदाचित् मुसळधार पावसामुळे हा कोळसा आसाम किंवा बांगलादेश येथे वाहून गेला असेल. हा माझा तर्क आहे याविषयी कोणताही ठोस पुरावा नाही.

महिलेच्या छातीला स्पर्श करणे, हा बलात्काराचा प्रयत्न नाही ! – उच्च न्यायालय
Railway Bedsheets Theft : रेल्वेच्या वातानुकूलित डब्यांमधून चादर, ब्लँकेट आणि टॉवेल चोरीला जाण्याच्या घटनांमध्ये वाढ !
Amarkantak Temple Donation Scam : अमरकंटक (मध्यप्रदेश) येथील नर्मदा उगम मंदिरातील सोने-चांदी गायब !
Three Language Policy : इंग्रजी भारताचीच स्थानिक भाषा मानली जाऊ शकते का ? – सर्वाेच्च न्यायालयाचा प्रश्न
पाकिस्तानी क्रिकेटपटू भारताच्या दौर्यावर असतांना करत होते अमली पदार्थांची तस्करी ! – R. V. S. Mani
Karnataka AI University : बेंगळुरूत देशातील पहिले ‘एआय’ विद्यापीठ चालू करणार !