
मुंबई, २१ जुलै – विधीमंडळात नुकतीच शरदचंद्र पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांचे कार्यकर्ते आणि भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांचे कार्यकर्ते यांच्यात हाणामारी झाली होती. त्यामध्ये सर्जेराव बबन टकले आणि नितीन हिंदुराव देशमुख या दोघांवर गुन्हा नोंद करण्यात आला असून पोलिसांनी त्यांना अटक केली होती. आज विधानभवनातील मारहाणीच्या प्रकरणी सर्जेराव टकले आणि नितीन देशमुख या दोघांना मरीन ड्राईव्ह पोलिसांनी आझाद मैदान येथील दंडाधिकारी न्यायालयात उपस्थित केले होते. या दोघांना न्यायालयाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
विधानभवन मारहाणीच्या प्रकरणात आणखी दोन ते तीन आरोपींचा शोध पोलिसांकडून घेतला जात आहे. नितीन देशमुख यांचा एक सहकारी, ऋषिकेश टकले यांच्यासोबत असणार्या त्यांच्या २ सहकार्यांचा सध्या पोलीस शोध घेत आहेत.
नवी मुंबईत महापालिकांच्या शाळेत आता इंग्रजी माध्यमातून बालवाडीचे वर्ग चालू होणार !
शेतकर्यांच्या कर्जमुक्ती योजनेची कार्यवाही आता ऑनलाईन होणार !
मालाडमध्ये जागतिक दर्जाचे ‘मिडिया हब’ उभारणार !
आंबिवली (कल्याण) येथील इराणी लोकांकडून बसवर दगडफेक; प्रवासी घायाळ
जिन्यामध्ये थुंकू नये म्हणून लावलेल्या देवतांच्या टाईल्स पोलीस प्रशासनाच्या साहाय्याने काढल्या !
जेजुरीतील रसायनयुक्त भंडार्याच्या विक्रीविरुद्ध भाजप आमदार विक्रम पाचपुते आक्रमक !