‘आषाढ मासाच्या शुक्ल पक्षाच्या ‘देवशयनी’ एकादशीपासून कार्तिक मासाच्या शुक्ल पक्षाच्या ‘देवउठी’ एकादशीपर्यंत चातुर्मास मानला जातो. चातुर्मासात भजन, ध्यान, जप, स्वाध्याय (पारायण), मौन रहाणे, स्मरण करणे अधिक हितकारी आहे.

१. मिळवा तीर्थस्नानाचे फळ !
चातुर्मासात भगवान नारायण योगनिद्रेत शयन करतात, त्यामुळे पाण्याचा प्रवाह सात्त्विक होतो. तीळ आणि जव वाटून ठेवावेत. स्नानाच्या बादलीभर पाण्यात ते चिमूटभर मिश्रण टाकावे, तसेच सुलभ झाल्यास २-४ बेलपत्र घालावे. बेलपत्र ७ दिवस शिळे मानले जात नाही. ‘ॐ नमः शिवाय’ असा नामजप करून स्नान केले, तर तीर्थांमध्ये स्नान करण्याचे फळ मिळते. उटण्यात (उबटन) जव आणि तीळ आहेत; म्हणून ते उटणेही स्नानासाठी सुखदायी अन् आनंददायी असते.
२. चातुर्मासात काय करावे ? आणि काय करू नये ?
अ. चातुर्मासात लग्नकार्य, सकाम कर्म वर्जित आहेत. पती-पत्नीचा कामभोगही वर्जित आहे. या दिवसांत विषयविकारांपासून, परनिंदेपासून, परक्या अन्नापासून, परक्या धनापासून, परस्त्रीपासून, परपुरुषापासून संयमी जीवन जगावे. गुळाच्या त्यागाने स्वभावात माधुर्य येते, तेलाच्या स्वादाचा त्याग केल्याने संतती दीर्घजीवी होते आणि सुगंधित तेलाच्या त्यागाने सद्भाग्याची प्राप्ती होते, असे म्हटले जाते. असत्य भाषण (खोटे बोलणे), क्रोध, मध आणि पर्वाच्या दिवशी मैथुन यांचा त्याग करणारा अश्वमेध यज्ञाचे फळ मिळवतो.
आ. गृहस्थ व्यक्तीने शुक्ल पक्षाच्या सर्व एकादशी तर केल्याच पाहिजेत; परंतु चातुर्मासातील कृष्ण पक्षाच्या एकादशीही अवश्य केल्या पाहिजेत. अर्थात् वर्षभरात १२ एकादशी शुक्ल पक्षाच्या आणि ४ एकादशी कृष्ण पक्षाच्या, अशा एकूण १६ एकादशींचे व्रत गृहस्थ व्यक्तीने केले पाहिजे. १५ दिवसांतून एकदा कडक उपवास ठेवल्याने १४ दिवसांचे खाल्लेले अन्न ओजात परिणत (शरिराचे चैतन्य आणि ऊर्जा सुधारणारे) होते. बुद्धीमान आणि आयुष्यमान बनण्यात उपवास साहाय्य करतो.
इ. या दिवसांत भूमीवर सतरंजी किंवा ब्लँकेट अंथरून शयन करावे किंवा गादी-तक्के हटवून साधे अंथरूण टाकून पलंगावर शयन करावे. जे स्टीलची भांडी न वापरता पळसाच्या पानांच्या पत्रावळीवर भोजन करतात, त्यांचे असे भोजन करणे, हे दुःख, दरिद्रता आणि पापाचा नाश करणारे अन् ब्रह्मभाव, परमात्मभाव यांची प्राप्ती करणारे होते.
ई. चातुर्मासात भगवान विष्णूंपुढे ‘पुरुषसूक्त’चा पाठ करणारा मनुष्य बुद्धीमान बनतो. कितीही बुद्धू (मंद) मुले-मुली असोत, त्यांना भगवान नारायणापुढे ‘पुरुषसूक्त’चा पाठ करायला लावल्यास त्यांच्यात चांगले पालट होऊ शकतात, असे मानले जाते.
उ. सूर्य उगवायचा असेल आणि चंद्र-तारे दिसत नसतील, ती ‘अमृतवेळ’ आहे. सूर्याेदयाच्या दीड-दोन घंटेपूर्वी जे उठतात, त्यांना सहज बुद्धीमान होता येते. जे सूर्याेदयाच्या वेळी किंवा सूर्याेदयानंतरही झोपून रहातात, त्यांची तब्येत, मानसिकता आणि बौद्धिकता ‘ढब्बू’ रहाते.
ऊ. जो भोगविलासाचा, स्वाद लोलुपतेचा त्याग करून एकवेळ साधे भोजन करील आणि मौनव्रताचे अवलंबन घेईल, त्याचा असा प्रभाव पडेल की, त्याचा संकल्प अन् त्याची आज्ञा कुणी भंग करू शकणार नाही. असा तो प्रभावशाली बनेल.
३. साधनेसाठीचा उत्तम काळ
चातुर्मासात साधना, भजन, ध्यान, जप इत्यादी करणारा, सुख-दुःखात सम रहाणारा, आपल्या आत्म्याचे अनुसंधान (अर्थासहित चिंतन) करणारा मनुष्य पुण्यशाली, महान आत्मा होतो आणि परमात्म प्रदान प्रतिष्ठित महापुरुषांना समजून घेण्याच्या सद्बुद्धीचा धनी होतो. सत्संग, मंत्रजप, मौन आणि परमात्म्याचे ध्यान तुमचे जीवन उन्नत करण्यात मोठे साहाय्य करतील. दान, दया आणि शमदम ही उत्तम धर्म मानले जातात. ‘शम’ म्हणजे मनाला आणि ‘दम’ म्हणजे इंद्रियांना अनुचित जागी जाण्यापासून रोखण्याची शक्ती.
ज्याने चातुर्मासात कोणताही व्रत-नियम घेतला नाही, त्याने समजावे की, त्याने हातात आलेला अमृतकलश खाली पाडण्याचा चुकीचा प्रयत्न केला; म्हणून सर्वांनी चातुर्मासाचा लाभ घ्यावा.’
(साभार : मासिक ‘ऋषी प्रसाद’, जून २०२५)
फलकप्रसिद्धीच्या माध्यमातून कर्नाटक राज्यात झालेला प्रभावी धर्मप्रसार !
‘श्रीराम हे दशरथाचे पुत्र नव्हते !’ – प्रा. के.एस्. भगवान
हिदु धर्माचा झेंडा !
केरळम्मधील दीपप्रज्वलनाचा वाद : राष्ट्रीय व्यक्तीमत्त्वाचा आत्मा संस्कृती कि धर्म ?