‘१९.६.२०२५ या दिवशी मी (सौ. मानसी राजंदेकर, पू. वामन यांची आई) आणि पू. वामन राजंदेकर (सनातनचे दुसरे बालसंत, वय ६ वर्षे) यांच्यामध्ये झालेला संवाद येथे दिला आहे.

१. पू. वामन यांनी ‘देव आणि गुरु यांच्याप्रती भाव सर्वांत महत्त्वाचा आहे’, असे सांगणे मी (सौ. मानसी राजंदेकर, पू. वामन यांची आई) : पू. वामन, भक्ती, भाव आणि तळमळ यांमध्ये प्रत्येक व्यक्ती किंवा साधक यांसाठी सर्वांत महत्त्वाचे आणि सर्वांत प्रथम काय असते ?
पू. वामन : आई, सगळ्यात आधी ‘देवाप्रती भाव’ महत्त्वाचा आहे; कारण कोणतीही गोष्ट पाहिली किंवा अनुभवली की, आपल्यामध्ये तिच्याप्रती आधी भाव निर्माण होतो. त्यानंतर भक्ती येते. जसे नारायण (टीप) किंवा एखादा देवबाप्पा यांच्याबद्दल आपल्या मनात भाव जागृत झाल्यावर आपल्यात भक्ती निर्माण होते. यानंतर आपल्यात तळमळ जागृत होते. त्यामुळे आपण कोणतीही कृती करण्यास सिद्ध होतो. आपल्याला आलेला एखादा विचार किंवा स्थिती यांतून बाहेर यायचे असले, तरीही तळमळ असावी लागते, तरच आपण तशी कृती करतो. (टीप : ‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांना पू. वामन ‘नारायण’, असे संबोधतात.)
या तीन गोष्टींविना साधक साधना करू शकत नाही आणि साधे कामसुद्धा पूर्ण करू शकत नाही. सर्वसाधारणपणे अन्य कुणालाही हे ठाऊक नसते. आपल्याला हे सगळे केवळ नारायण सांगतात; म्हणून समजते नाहीतर आपल्यालाही हे कधीच समजले नसते. त्यामुळे आपण नेहमी नारायणांचे सगळे ऐकायचे.

२. पू. वामन यांचे बोलणे ऐकल्यावर त्यांच्या आईचे झालेले चिंतन !
अ. पू. वामन यांचे वय ६ वर्षे आहे, तरीही त्यांचा अध्यात्मातील सर्व शब्द आणि सूत्रे यांचा अभ्यास असणे, हे वैशिष्ट्यपूर्ण आहे.
आ. ‘बुद्धीने कितीही ठरवले, तरी या लहान वयात अशी प्रगल्भतेने उत्तरे देणे, अशक्य आहे. ही केवळ पू. वामन यांच्यावरील गुरुकृपा आहे’, याची मला क्षणोक्षणी जाणीव होते.
इ. पू. वामन यांनी सांगितल्याप्रमाणे मी विचार केल्यावर माझ्या लक्षात आले, ‘मी साधनेत आल्यावर मला ‘भाव, भक्ती आणि तळमळ’ या शब्दांची ओळख झाली, तसेच इतक्या वर्षांत अनेक प्रसंग आणि अनुभूती यांत या तिन्ही शब्दांची प.पू. गुरुदेवांच्या कृपेने अनुभूती घेता आली, तरीही आता पू. वामन यांनी सांगितल्याप्रमाणे माझे चिंतन झाले नव्हते.’
ई. पू. वामन यांनी या तिन्ही शब्दांचा अर्थ आणि त्यांचे महत्त्व अगदी सहज अन् सोप्या पद्धतीने सांगितले आहे. ‘ही तिन्ही सूत्रे केवळ साधना करत असलेल्या व्यक्तीलाच नव्हे, तर सर्वसामान्य व्यक्तीलाही आवश्यक आहेत’, याची मला जाणीव झाली.
उ. आपण आपल्यातील ‘भाव, भक्ती आणि तळमळ’ वाढण्यासाठी नियमित प्रयत्न केले, तर आपले साधनेतील सातत्य टिकेल, अनुसंधान साधले जाईल, शरणागतीचे प्रयत्न वाढतील आणि आपल्याला आनंद मिळेल.
ऊ. पू. वामन सांगत असलेल्या प्रत्येक सूत्राचा आरंभ हा नारायण, म्हणजेच प.पू. डॉ. आठवले यांच्यापासून होतो आणि ते प.पू. गुरुदेवांविषयी बोलूनच बोलणे थांबवतात. पू. वामन यांच्या बोलण्यात नेहमी एक समान सूत्र असते. ते म्हणजे ‘आपल्याला सर्व काही नारायणच सांगतात. आपल्याला काहीच येत नाही किंवा समजत नाही.’
ए. पू. वामन यांची प.पू. गुरुदेवांवर दृढ श्रद्धा आहे. ते प्रत्येक क्षणाचे कर्तर्ेपण त्याच क्षणी प.पू. गुरुदेवांच्या चरणी अतिशय सहजतेने अर्पण करतात. ‘पू. वामन यांचा हा स्थायीभाव असल्याने त्यांना ते सहजतेने जमते’, असे माझ्या लक्षात आले.
‘गुरुदेवा, हे क्षण मला अनुभवायला मिळणे’, ही केवळ आपली कृपा आहे. आपल्याच कृपाशीर्वादाने पू. वामन यांच्या सत्संगातून मला महत्त्वाची सूत्रे शिकता आणि अनुभवता येत आहेत. याबद्दल मी आपल्या चरणी कितीही कृतज्ञता व्यक्त केली, तरीही ती अल्पच आहे.’
– सौ. मानसी अनिरुद्ध राजंदेकर (पू. वामन यांची आई), फोंडा, गोवा. (२०.६.२०२५)
हिंदु जनजागृती समितीच्या वतीने विरार येथे धर्मप्रेमींसाठी ‘स्नेह’ मेळावा !
स्वीकारण्याची वृत्ती असलेल्या आणि तळमळीने अन् भावपूर्ण सेवा करणार्या रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमातील श्रीमती मधु मेहता !
रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात झालेल्या साधनावृद्धी शिबिराच्या वेळी साधकांना जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती
साधकांचा आधारस्तंभ असलेल्या आणि भजनांतून देवाला आळवणार्या ६१ टक्के आध्यात्मिक पातळीच्या नागपूर येथील कै. (सौ.) जयश्री क्षीरसागर (वय ७१ वर्षे) !
साधक, धर्मप्रेमी आणि हिंदुत्वनिष्ठ यांना मार्गदर्शन करून त्यांना साधना करण्यास उद्युक्त करणारे कर्नाटकातील सनातनचे ७५ वे (समष्टी) संत पू. रमानंद गौडा (वय ५० वर्षे) !
साधकांनो, येणार्या आपत्काळाला सामोरे जाण्यासाठी श्रद्धेच्या बळावर साधनेतील अडथळ्यांवर मात करा !