१. गुरूंसमवेत बसणे

अ. ‘सदाचार आणि संयम यांनी युक्त होऊन गुरूंनी अनुज्ञा दिल्यावर त्यांच्यासमोर बसावे.
आ. गुरूंच्या निकट बसू नये.
इ. गुरूंच्या समीप शिष्याचे आसन सदा खाली असावे. गुरु पहात असतांना त्यांच्यासमोर मनास येईल तसे बसू नये.
ई. गुरूंच्या समीप पाय पसरून बसू नये. तसेच गुरूंच्या समीप जांभई देऊ नये, हसू नये किंवा आवाज करू नये.
उ. आसन, शय्या आणि वाहन यांवर गुरूंसह बसू नये.
ऊ. बैल, अश्व, उंट इत्यादी वाहनांवर, तसेच प्रसाद (देऊळ), शिळाखंड, प्रस्तर (खडक), चटई, बैठका यांवर गुरूंसमवेत बसावे.
२. गुरूंशी बोलणे

अ. गुरूंशी बोलतांना मधुर वाणीचा उपयोग करावा.
आ. गुरूंच्या उत्तरास प्रत्युत्तर देऊ नये.
इ. गुरु दूर असल्यावर, क्रोधयुक्त असल्यावर आणि स्त्रीच्या समीप असतांना त्यांची अर्चना (पूजा) करू नये. (पूजा आणि अर्चा हे दोन्ही शब्द समानार्थी आहेत. अर्चा हा संस्कृत शब्द आहे. पूजा-अर्चा म्हणण्याची प्रथा आहे.)
३. गुरूंशी वागणे
अ. सदा हितकारी असावे.
आ. काम, क्रोध, लोभ, चहाडी करणे, निद्रा इत्यादींचा त्याग करावा.
इ. उभे असतांना, बसतांना, खातांना आणि झोपतांना गुरूंकडे पाठ करून त्यांची आज्ञा ग्रहण करू नये किंवा त्यांच्याशी संभाषण करू नये.
ई. गुरूंना विचारल्याविना कुठे जाऊ नये.
उ. गुरु चालले की, त्यांच्यामागे जावे.
ऊ. त्यांच्या हिताचे काम करावे. त्यांच्या आज्ञेप्रमाणे सेवा करावी.
ए. आपणास प्राप्त झालेल्या वस्तू त्यांना समर्पित कराव्यात.
४. गुरुजनांशी व्यवहार
अ. गुरूंच्या गुरूंवरही भक्ती करावी.
आ. गुरुपत्नींची गुरुतुल्य सेवा करावी.
इ. गुरूंची पत्नी, पुत्र, स्वकीय आणि बांधव यांच्याप्रती गुरूंसारखा व्यवहार करावा.
५. टाळावयाच्या पापकारक कृती
अ. गुरूंचे निर्माल्य, खडावा, पादत्राणे, आसन, शय्या आणि छाया यांचे कधीच उल्लंघन करू नये.
आ. गुरूंसमक्ष त्यांचे नाव घेऊ नये. त्यांची चाल आणि त्यांचे बोलणे यांचे अनुकरण करू नये.
इ. जेथे गुरूंच्या मताचे खंडण होत आहे किंवा त्यांची निंदा होत आहे, तेथे शिष्याने आपले कान बंद करून घ्यावेत अथवा तेथून निघून जावे.
ई. गर्वयुक्त कार्य आणि अकार्य न जाणणार्या कुमार्गगामी गुरूंचा त्याग करण्यास मनूने सांगितले आहे.
( – परात्पर गुरु पांडे महाराज, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (१५.७.२०१६) संदर्भ : ‘ब्रह्मचारीचा आचार’ – कूर्मपुराण, लेखक – प्र.न. जोशी, पृ.क्र. २४४ आणि २४५)
ब्रह्मचार्याचे काही आचार
१. आचमन करून आणि उत्तराभिमुख होऊन अध्ययन करावे.
२. पवित्र कुशांना (दर्भांना) धारण करून, तीन प्राणायाम करून आणि पवित्र होऊन ओंकाराचा उच्चार करावा.’
(संदर्भ : ‘ब्रह्मचारीचा आचार’ – कूर्मपुराण, लेखक – प्र.न. जोशी, पृ.क्र. २४४ आणि २४५)
मुंबई येथे सनातन संस्थेने केलेल्या ‘श्री राजमातंगीदेवी महायज्ञा’च्या संदर्भात सनातन संस्थेच्या हितचिंतकांनी व्यक्त केलेले मनोगत !
श्री जगन्नाथदेवाची आध्यात्मिक गुणवैशिष्ट्ये !
साधकांनो, शब्दशक्तीच्या माध्यमातून विकल्प पसरवण्यासाठी कार्यरत असलेल्या सातव्या पाताळातील मोठ्या वाईट शक्तींचा डाव ओळखून साधना वाढवा !
साधकांनो, स्वतःमधील स्वभावदोषांमुळे खचून न जाता सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांनी सांगितलेल्या साधनेवर अढळ श्रद्धा ठेवून प्रयत्नरत रहा !
कलेच्या माध्यमातून समाजापर्यंत साधना पोचवण्यासाठी करायच्या समष्टी सत्सेवेची माध्यमे !
समर्थ रामदासस्वामींच्या ‘दासबोधा’तील संदर्भांवरून ‘१०८’ या जपसंख्येचे महत्त्व !