२ मुसलमान तरुण पोलिसांच्या कह्यात
गाझियाबाद (उत्तरप्रदेश) – येथील सिहानी चुंगी चौकीजवळील राष्ट्रीय महामार्ग – ५८ वर असलेल्या ‘दिल्ली ज्यूस कॉर्नर’ या दुकानात फळांच्या रसामध्ये थुंकी मिसळून कावड यात्रेकरूंना दिले जात होते. ही घटना समोर आल्यानंतर येथे तणाव निर्माण झाला आहे. पोलिसांनी या प्रकरणी २ मुसलमान तरुणांना कह्यात घेतले असून त्यांची चौकशी करण्यात येत आहे.
🚨 Treachery on the Pilgrimage Route: A Wake-Up Call for Hindus! 🛑🕉️
Ghaziabad (U.P.): 2 Muslims from ‘Delhi Juice Corner’ & ‘Bharat Juice’ accused of mixing spit & urine in juice served on Kanwariya route! 😡
🧪 Food samples sent for lab testing; police have detained the… pic.twitter.com/k1lJS1lQ4H
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) July 14, 2025
१. स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, रसामध्ये थुंकी आणि मूत्र यांसारख्या गोष्टी मिसळल्या जात होत्या. दुकानाच्या पडताळणीच्या वेळी पिवळ्या रंगाची एक संशयास्पद बाटली आढळल्याचा दावाही करण्यात आला.
२. घटनेची माहिती मिळताच हिंदु संघटनांचे कार्यकर्ते घटनास्थळी पोचले आणि आरोप केला गेला की, ‘दिल्ली ज्यूस कॉर्नर’ हे नाव हिंदु यात्रेकरूंमध्ये भ्रम निर्माण करण्यासाठी ठेवले गेले आहे. हे दुकान मुसलमान व्यक्ती चालवत आहे.
३. सूचना मिळताच पोलिसांनी घटनास्थळी जाऊन परिस्थिती नियंत्रणात आणली आणि दुकानात काम करणार्या २ मुसलमान युवकांना कह्यात घेऊन त्यांची चौकशी चालू केली.
४. अन्न सुरक्षा अधिकारी भावना अगरिया यांच्या नेतृत्वाखाली पथकाने येथील रस आणि अन्य साहित्य यांचे नमुने घेतले असून ते प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवले आहेत. ‘याचा अहवाल आल्यानंतर नियमांनुसार कठोर कारवाई केली जाईल’, असे त्यांनी सांगितले. (आरोप झाल्यानंतर अशा प्रकारची तपासणी करणारा हा विभाग आधीच सतर्क होऊन अशा तपासण्या का करत नाही ? – संपादक)
५. या घटनेच्या एक दिवस आधी येथील सिद्धार्थ विहार परिसरातील ‘भारत ज्यूस’ या दुकानावरही अशाच प्रकारचा आरोप करण्यात आला होता. या दुकानाचा मालकही मुसलमान आहे.
संपादकीय भूमिकाया घटनेविषयी समाजवादी पक्षाचे मुसलमानप्रेमी प्रमुख अखिलेश यादव तोंड का उघडत नाहीत ? कि त्यांना हिंदु भाविकांनी मुसलमानांनी फसवणूक करून अपवित्र केलेले पदार्थ खाणे योग्य असल्याचे वाटते ? |

देशातील ३ राज्यांत लव्ह जिहादच्या ४ घटना उघड !
तेलंगाणातील महिला तहसीलदाराची २० कोटी रुपयांची बेहिशोबी मालमत्ता जप्त !
Ujjain Muharram : मध्यप्रदेशातील बडनगर येथे क्रेनद्वारे चारचाकी हवेत लटकवून ती स्फोटाने जाणूनबुजून उडवून दिली !
श्रीराममंदिरातील दान चोरीच्या प्रकरणात मोठ्या लोकांना सोडून दिले ! – Shankaracharya Avimukteshwaranand Saraswati
NCERT : पुस्तकात वैदिक काळात महिलांना सन्मान मिळत असल्याचे सांगत मनुस्मृतीतील श्लोकाचा उल्लेख !
Operation Sindoor : ‘ऑपरेशन सिंदूर’मध्ये वीरमरण आलेल्या ६ भारतीय सैनिकांची नावे प्रथमच जाहीर !