
तेहरान (इराण) – इराणने मार्च २०२५ मध्ये घोषणा केली की, ‘बेकायदेशीर अफगाणी स्थलांतरितांनी ६ जुलै २०२५ पर्यंत देश सोडावा, अन्यथा त्यांना बलपूर्वक हाकलून लावले जाईल.’ या घोषणेनुसार इराणने २४ जून ते ९ जुलै या १६ दिवसांत ५ लाखांहून अधिक अफगाणी घुसखोरांना देशातून बाहेर काढले आहे.
🇮🇷 Iran deports 5 lakh illegal Afghan migrants in just 16 days; that’s 30,000 per day! 🚍🚫
If Iran can protect its internal security, why can’t 🇮🇳 India take firm action against illegal Bangladeshis & Rohingyas? ❓
By year-end, Iran & Pakistan may expel 30 lakh Afghans! ⚠️… pic.twitter.com/aBaG59kRIS
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) July 12, 2025
म्हणजेच प्रतिदिन सरासरी ३० सहस्र अफगाणी नागरिकांना देशाबाहेर काढण्यात आले. इस्रायलशी झालेल्या तणावपूर्ण संघर्षानंतर इराण अंतर्गत सुरक्षेचा हवाला देत स्थलांतरितांवर कठोर कारवाई करत आहे.

वर्षाच्या शेवटी इराण आणि पाक येथून ३० लाख अफगाणी हाकलले जातील !
वर्ष २०२५ मध्ये आतापर्यंत इराण आणि पाकिस्तान या देशांमधून १६ लाख अफगाणिस्तान्यांना परत पाठवण्यात आले आहे. वर्षाच्या शेवटी ही संख्या ३० लाखांपर्यंत वाढू शकते. संयुक्त राष्ट्र मानवाधिकार आयोगातील अफगाणिस्तानचे प्रतिनिधी अराफत जमाल यांच्या मते, अफगाणिस्तान इतक्या मोठ्या प्रमाणावरील लोकांना स्वीकारण्यास सिद्ध नाही. अफागणिस्तानमध्ये रहाण्यासाठी जागा नाही, रोजगार नाही, सुरक्षितता नाही.
संपादकीय भूमिकाइराण असे करू शकतो, तर भारत बांगलादेशी आणि रोहिंग्या यांच्याविषयी असे का करू शकत नाही ? |
अन्नसुरक्षा नियमांचे उल्लंघन केल्याने हॉटेल, बेकरी, डेअरी यांचे परवाने निलंबित !
प्रवाशांना नेहमी स्वच्छ आणि वापरण्यायोग्य सुविधा उपलब्ध करून द्या !
दक्षिण आफ्रिकेत १७ सहस्र हिंदूंनी एकत्र येऊन केले हनुमान चालिसाचे पठण !
इराणच्या आक्रमणात जॉर्डनमधील २ अमेरिकी सैनिक ठार : अमेरिकेचे प्रत्युत्तर !
मी मुसलमान आहे; पण देशात शरीयत लागू करणार नाही ! : Burkina Faso President Ibrahim
पाकव्याप्त काश्मीरमधील आंदोलकांवरील दडपशाहीविषयी संयुक्त राष्ट्रांकडून चिंता व्यक्त !