
पुणे – राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार २ भारतीय भाषा आणि १ परदेशी भाषा शिकवण्याचे सूचित करण्यात आले आहे; मात्र केंद्रीय विद्यार्थी संघटन (के.व्ही.एस्. शाळा), सैनिकी शाळा आणि अन्य शाळा यांमध्ये मराठी विषय न शिकवता हिंदी अन् संस्कृत विषय शिकवला जात असल्याची माहिती समोर आली आहे. सैनिकी शाळेतील एका शिक्षकाने दिलेल्या माहितीनुसार ज्या विद्यार्थ्यांना मराठी भाषा शिकण्याची इच्छा आहे, त्या विद्यार्थ्यांनी तसे लेखी निवेदन शाळेला दिले, तर त्यांना मराठी भाषा शिकवण्यासाठी शिक्षक उपलब्ध करून देण्यात येतात; पण त्यासाठी विद्यार्थी संख्या २५ हून अधिक असणे आवश्यक आहे.
केंद्रीय विद्यार्थी संघटन शाळा, सैनिकी शाळेत मराठी विद्यार्थ्यांची टक्केवारी लक्षणीय आहे; पण मराठी भाषा शाळेत न शिकवल्याने त्यांना मराठी व्यवस्थित बोलता येत नाही. राज्यात मराठी भाषा शिकवणे सक्तीचे आणि अनिवार्य आहे. त्यामुळे केंद्रीय विद्यार्थी संघटन आणि सैनिक शाळांत मराठी भाषा शिकवण्यासाठी पाठपुरावा घेणार असल्याचे प्राथमिक शिक्षण संचालनालयाचे संचालक शरद गोसावी यांनी सांगितले.
संपादकीय भूमिकाराज्यातील केंद्रीय शाळांमध्ये मराठी शिकवली जात नाही, याकडे प्रशासन लक्ष देऊन कार्यवाही करणार का ? |
थोडक्यात महत्त्वाचे (०७.०६.२०२६)
मंदिर संस्कृती : राष्ट्रनिर्मिती, अर्थव्यवस्था आणि समाजउन्नती यांचे केंद्र !
मंदिरे : राष्ट्ररचनेचे मजबूत आधारस्तंभ !
संपादकीय : हिंदू जात्यात !
जगद्गुरु संत तुकाराम महाराज पालखी मार्गाची विभागीय आयुक्तांकडून पहाणी
पाथर्डी येथे ‘प्रोटीन’ऐवजी गुंगीकारक औषध विकणार्या मुसलमानास अटक !