
नाशिक – नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथे वर्ष २०२७ मध्ये होणार्या सिंहस्थ कुंभपर्वातील गर्दीचे नियंत्रण करण्याचे दायित्व पोलिसांसमवेत नाशिकमधील ५ सहस्र महाविद्यालयीन विद्यार्थ्यांकडे सोपवण्यात आले आहे. त्यांना याचे प्रशिक्षण देण्यासाठी नाशिक पोलिसांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापिठासमवेत चर्चा केली आहे. संबंधित विद्यार्थ्यांना याचे श्रेणी किंवा विशेष गुण मिळतील, याचेही नियोजन करण्यात आले आहे.
१. यासाठी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमधून प्रशिक्षित स्वयंसेवक सिद्ध करण्यात येणार आहेत.
२. कृत्रिम बुद्धीमत्ता, विद्यार्थ्यांचे कौशल्य, त्यांची आवड लक्षात घेत त्यांना स्वयंसेवक, गर्दी व्यवस्थापन, सुरक्षा, चेंगराचेंगरी, आपत्कालीन परिस्थिती हाताळण्याचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे.
३. या विद्यार्थ्यांकडे वाहतूक, वैद्यकीय, मदत कक्ष, स्वयंसेवा, आपत्ती, तसेच गर्दी व्यवस्थापन, नियंत्रण कक्षात काम असे विविध दायित्व देण्यात येणार आहेत.
४. ५ सहस्र विद्यार्थ्यांची कुंभपर्वात स्वयंसेवक म्हणून नियुक्ती करण्यात येणार आहे. त्यांना ओळखपत्र दिले जाईल. या कामासाठी पालकांचीही संमती घेण्यात येणार आहे. या शैक्षणिक वर्षापासून त्यांना प्रशिक्षण देण्यास प्रारंभ होईल.
पुणे येथे अधिवक्ता एस्.के. जैन यांना ‘जीवन गौरव पुरस्कार’ !
पानशेत (पुणे) पूरग्रस्त सोसाट्यांचे प्रश्न ६५ वर्षांनंतरही प्रलंबित !
हडपसर येथे हिंदुत्वनिष्ठ कार्यकर्त्याला साहिल शेख आणि त्याच्या टोळीकडून बेदम मारहाण !
कामोठे येथे भटक्या कुत्र्याचे १० जणांवर आक्रमण !
भोंदू बाबा फिरोज शेख याला २ दिवसांची पोलीस कोठडी !
पुणे शहरात १९ जुलैला ‘श्री जगन्नाथ रथयात्रा महोत्सव’ !