
कन्नूर (केरळ) – गुरुकुलात वैदिक शिक्षण घेतलेला कन्नूर येथील रहिवासी गोविंद कृष्णन् एम्. लवकरच तिरुवनंतपुरममधील थुंबा येथील ‘इस्रो’चे प्रमुख केंद्र असलेल्या ‘विक्रम साराभाई स्पेस सेंटर’मध्ये शास्त्रज्ञ म्हणून रुजू होणार आहे.
१. वैदिक अभ्यासात पारंगत असलेला गोविंद, त्याचे गुरुकुलातील सहकारी पौरोहित्याकडे वळले असतांनाही विज्ञानाकडे वळाला. गोविंद म्हणतो, ‘आध्यात्म आणि विज्ञान एकत्र येऊ शकत नाहीत’, असे म्हटले जाते; पण हे शक्य असल्याचे मी सिद्ध केले आहे.
२. तो पुढे म्हणाला, ‘‘माझ्या आयुष्याच्या एका टप्प्यात मी वैदिक शिक्षणाला माझे सर्वोत्तम दिले आणि दुसर्या टप्प्यात मी विज्ञानाला माझे सर्वस्व दिले. पण मी कधीही एकाला दुसर्यासाठी पूर्णपणे सोडले नाही.’’
३. वर्ष २०११ मध्ये त्याने पय्यान्नूरमधील केंद्रीय विद्यालयातून इयत्ता चौथी पूर्ण केल्यानंतर नियमित शिक्षण सोडून दिले आणि त्रिशूरमधील ब्रह्मास्वम् मठामध्ये ४ वर्षे गुरुकुलमध्ये शिक्षण घेतले.
४. गोविंदचा उपनयन विधी तो चौथीत असतांना झाला होता आणि त्यानंतर लगेचच त्याने गुरुकुलाचा प्रवास चालू केला.
५. त्यानंतर गोविंदने पुन्हा नियमित शाळेत जाण्यास चालू केले. गुरुकुलात राहून त्याने दहावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर गुरुकुलातून बाहेर पडून उच्च माध्यमिक शिक्षणासाठी मंगळुरूतील मूडबिद्री येथील अल्वाज महाविद्यालयात प्रवेश घेतला. नंतर त्याने थिरुवनंतपुरममधील वलियामला येथील ‘इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ स्पेस सायन्स अँड टेक्नॉलॉजी’ मधून ‘बी.टेक’ पदवी मिळवली.
६. गोविंदची ‘इस्रो सेंट्रल रिक्रूटमेंट बोर्ड’ प्रक्रियेद्वारे निवड झाली असून जुलैमध्ये तो अधिकृतपणे ‘इस्रो’मध्ये रुजू होणार आहे.
७. आपल्या व्यावसायिक जीवनातही दैनंदिन धार्मिक कृती चालू ठेवण्याची त्याची इच्छा आहे. तो म्हणतो की, वैदिक शिक्षणाने त्याला लक्ष, शिस्त आणि सामर्थ्य दिले आहे.
८. गोविंदचे वडील हरेश कुमार हे भारतीय नौदलाचे माजी अधिकारी आहेत.
संपादकीय भूमिका
|
परळी (बीड) येथे शिक्षणासाठी विद्यार्थ्यांचे आंदोलन !
सिंधुदुर्ग किल्ल्याच्या बुरुजाच्या पायथ्याचे काही दगड कोसळले !
‘एस्.एन्.डी.टी. महिला विद्यापिठा’च्या कारभाराची चौकशी होणार !
FIR Against Kunal Kamra : विनोदी कलाकार कुणाल कामरा याच्याविरुद्ध हिंदूंच्या भावना दुखावल्याच्या प्रकरणी तक्रार !
निष्क्रीय इच्छामरणाचा निर्णय घेण्यासाठी महाराष्ट्रात होणार समित्यांची स्थापना !
Badrinath Temple Arrest : बद्रीनाथ मंदिरातील दान चोरीच्या प्रकरणी मंदिराच्या माजी अधिकार्याला अटक