
पुणे – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापिठात ३०० कोटी रुपयांची आर्थिक अनियमितता झाल्याचा गंभीर आरोप अधिवक्ता कौस्तुभ पाटील यांनी पत्रकार परिषदेमध्ये केला आहे. या संदर्भातील काही अधिकृत कागदपत्रे त्यांनी सर्वांसमोर मांडली. विद्यापिठातील तृतीय श्रेणीचे स्थावर निरीक्षक विजय ढवळे यांनी कार्यकारी अभियंता (स्थावर) यांच्या साहाय्याने कोट्यवधी रुपयांच्या देयकांना मान्यता दिली. जी विद्यापिठाच्या नियमांनुसार पूर्णत: नियमबाह्य आहे. तृतीय श्रेणीच्या कर्मचार्याला प्रथम श्रेणी पदाचा कार्यभार देणे हेही नियमबाह्य आहे. (याविषयी विद्यापीठ प्रशासनाने स्पष्टीकरण देणे आवश्यक आहे ! – संपादक)
परदेशी यांची १ मार्च २०२३ या दिवशी रिअल इस्टेट विभागाच्या कार्यकारी अभियंता पदावर नियुक्ती झाली होती. त्यानंतर नियमानुसार विजय ढवळे यांचा अतिरिक्त कार्यभार संपुष्टात यायला हवा होती; परंतु मार्च २०२५ पर्यंत ढवळे यांनी कार्यभार स्वीकारला. या काळात निविदा प्रसिद्ध करणे, देयके संमत करणे, पत्रव्यवहार करणे हे अधिकार नसतांनाही ढवळे यांनी केले. प्रत्येक वर्षी ९० ते ९५ लाख रुपयांची देयके संमत करण्यात येत होती. ३ वर्षांत अनुमाने ३०० कोटी रुपयांची आर्थिक अनियमितता झाली आहे.
रिअल इस्टेट विभागाचे अधिकारी विजय ढवळे यांनी सांगितले की, माझ्यावर जे आरोप करत आहेत, त्यांच्याकडेच बहुधा माझ्यापेक्षाही अधिक माहिती आहे. त्यांनी हे आरोप सिद्ध करावेत.
Amarkantak Temple Donation Scam : अमरकंटक (मध्यप्रदेश) येथील नर्मदा उगम मंदिरातील सोने-चांदी गायब !
डहाणू (जिल्हा पालघर) येथे होणार जगातील सर्वांत मोठ्या कृषी बाजाराची उभारणी !
थोडक्यात महत्त्वाचे (दि : १५.०७.२०२६)
कोल्हापूर येथील श्री महालक्ष्मीदेवी मंदिरात पाण्याची गळती !
हॉटेलवर कारवाई करणार्या पोलिसाचे निलंबन रहित !
चाकण (पुणे) येथील साहाय्यक पोलीस निरीक्षकाने मागितली १० लाख रुपयांची लाच