पुणे रेल्वेस्थानकाला ‘श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे’ यांचे नाव देण्याच्या मागणीवर होत असलेल्या टीकेवर खंडण

पुणे येथील भाजप खासदार प्रा. डॉ. (सौ.) मेधा कुलकर्णी यांनी ‘पुणे रेल्वेस्थानकाला ‘श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे’ यांचे नाव द्यावे’, अशी मागणी केली. त्यावर ठाकरे गटाने पुण्यातील बुधवार पेठेचे (वेश्या वस्ती असलेला भाग) नाव ‘मस्तानी पेठ करा’, असा सल्ला दिला आहे. तसे फलकही लावले आहेत. अनेक ब्रिगेडी आणि ब्राह्मणद्वेषी याचा विकृत आनंद समाजमाध्यमांवर घेत आहेत. ब्राह्मणद्वेषाचा कंड शमवत आहेत.


बुंदेलखंडाचे राजे छत्रसाल ज्यांनी छत्रपती शिवरायांकडून प्रेरणा घेऊन बुंदेलखंडात हिंदवी स्वराज्य स्थापन केले. त्यांची कन्या मस्तानी या प्रणामी पंथाच्या (कृष्ण उपासक) होत्या. छत्रसाल राजे वृद्ध झाले आणि त्यांच्यावर यवनी आक्रमण झाले, तेव्हा त्यांनी छत्रपतींचे तत्कालीन पेशवे रणधुरंधर बाजीराव पेशवे यांच्याकडे साहाय्य मागितले. छत्रसाल राजा आणि छत्रपती शिवराय यांचे मैत्रीचे संबंध होते, हे लक्षात घेऊन थोरले बाजीराव यांनी बुंदेलखंडाचे रक्षण केले.
श्रीमंत बाजीरावांवर गरळ ओकणार्यांनी त्यांच्या १ टक्का तरी कर्तृत्व गाजवून दाखवावे !![]() पुणे रेल्वेस्थानकाच्या नावावरून श्रीमंत बाजीराव यांच्याविषयी जे दोन कवडीचे लोक गरळ ओकत आहेत, त्यांनी बाजीराव यांच्या कर्तृत्वाच्या १ टक्का तरी कर्तृत्व गाजवून दाखवावे ! – श्री. भरत आमदापुरे, अभियंता, पुणे. (२५.६.२०२५) |
मस्तानी ही शिवछत्रपतींच्या मित्राची कन्या होती, याचे हेतूपुरस्सर विस्मरण या नतद्रष्टांना झाले आहे. हे स्वतःला छत्रपती शिवरायांचे मावळे समजतात; पण प्रत्यक्षात शिवरायांच्या मित्राच्या कन्येची अशी अवहेलना करतांना त्याची लाज वाटत नाही; कारण डोक्यात भिनलेला पराकोटीचा ब्राह्मणद्वेष ! या मस्तानीच्या मुलाने, म्हणजे समशेर बहादूर याने पानिपतावर स्वतःचे प्राण देऊन अब्दालीचा, म्हणजे परकीय यवनी आक्रमकांचा वरवंटा रोखण्यात हातभार लावला होता. त्यांच्या आईविषयी बोलतांना यांना लाजा वाटत नाहीत; कारण ब्राह्मणद्वेष !
‘तुम्ही ब्राह्मणद्वेष अवश्य करा. काही हरकत नाही; पण आपल्या मूर्खपणाने आपण महापुरुषांच्या कन्येची अवहेलना करत आहोत’, एवढे लक्षात ठेवले, तरी पुष्कळ आहे. आज हिंदुहृदयसम्राट कै. बाळासाहेब ठाकरे हयात असते, तर या मूर्खांची अवस्था काय झाली असती, याचा विचार करावा ! बाकी ब्राह्मणद्वेष अवश्य करा; कारण त्यावर तुमची दुकाने चालणार आहेत.
– वेदमूर्ती भूषण दिगंबर जोशी, वेंगुर्ले, सिंधुदुर्ग. (२६.६.२०२५)
संपादकीय भूमिका,सत्याचा विपर्यास आणि अभ्यासहीन टीका करून ब्राह्मणद्वेष करणार्या विकृतांच्या वैचारिकतेची कीव करावी तेवढी थोडी ! |

नांदणी मठाची ‘माधुरी’ हत्तीण परत आणण्याचे प्रयत्न अंतिम टप्प्यात ! – डॉ. राजेंद्र पाटील-यड्रावकर, आमदार
गुरूंचे माहात्म्य अन् शिष्याची गुरुभक्ती
शिष्याला ईश्वरप्राप्तीकडे गतीमान करणारी गुरुकृपा !
देहू येथील श्री संत तुकाराम महाराज संस्थानच्या वतीने वारीत अपघाती मृत्यू झाल्यास १ लाख रुपयांचे साहाय्य !
Pune Love-Jihad : हिंदु तरुणीला प्रेमजाळ्यात ओढण्याचा प्रयत्न करत सुफियान खान याच्याकडून मानसिक छळ !
अजित पवार यांची जयंती सर्व शासकीय कार्यालयांमध्ये साजरी होणार !