सोलापूर – आषाढी वारीच्या निमित्ताने जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी पंढरपूर शहर आणि विविध ठिकाणी मद्यबंदीचे आदेश दिले आहेत. यात ४ ते ७ जुलै या कालावधीत पंढरपूर शहर आणि ५ किलोमीटर परिसरातील सर्व देशी, विदेशी, मद्याची आणि ताडीची दुकाने पूर्णत: बंद रहातील. ९ आणि १० जुलैला पंढरपूर शहरात परत ही दुकाने बंद रहातील. जगद्गुरु संत तुकाराम महाराज आणि संतश्रेठ ज्ञानेश्वर माऊली यांची पालखी मुक्कामाच्या ३० जून या दिवशी नातेपुते, १ जुलै या दिवशी माळशिरस, अकलूज येथे पूर्ण दिवस बंद रहातील,
२ जुलै या दिवशी वेळापूर, बोरगांव, श्रीपूर, माळीनगर पूर्ण दिवस बंद असेल, ३ जुलै या दिवशी भंडीशेगाव, पिराची कुरोली पूर्ण दिवस बंद असेल, तर ४ जुलै या दिवशी वाखरी पूर्ण दिवस बंद राहील. (खरे पहाता मद्यबंदी हे केवळ आषाढी वारीच्या कालावधीत न होता देहू-आळंदी, पंढरपूर अशा तीर्थक्षेत्रांच्या १० किलोमीटर परिसरात कायमस्वरूपी बंदीचा आदेश असणे अपेक्षित आहे. – संपादक)