|
(वस्त्रसंहिता म्हणजे मंदिरात प्रवेश करतांना परिधान करायच्या कपड्यांच्या संदर्भातील नियमावली)

मुरुडेश्वर (कर्नाटक) – येथील जगप्रसिद्ध श्री मुरुडेश्वर मंदिराच्या प्रशासनाने २२ जूनपासून मंदिरात वस्त्रसंहिता लागू केली आहे. हिंदु जनजागृती समिती, कर्नाटक मंदिर महासंघ आणि इतर अनेक हिंदुत्वनिष्ठ संघटन यांनी डिसेंबर २०२२ मध्ये मंदिर प्रशासनाला एक विनंती सादर केली होती. यामध्ये वस्त्रसंहिता लागू करण्याची विनंती करण्यात आली होती. याला प्रतिसाद देत प्रशासनाने आता ती लागू केली. याचे सर्वत्र स्वागत झाले आहे.
🏆 Victory for Temple Dress Code Campaign! 🙏👗
✅ Murudeshwar Temple to implement a dress code — a major success for the campaign by @HinduJagrutiOrg & @mandirmahasangh
🗣️ “Dress code must be mandatory in every temple!” – @MohanGowda_HJS State Spokesperson, HJS
🛕 250+… pic.twitter.com/w5rhGikA5s
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) June 24, 2025
हिंदु जनजागृती समितीचे कर्नाटक राज्य प्रवक्ते श्री. मोहन गौडा यांनी आशा व्यक्त केली की, या निर्णयामुळे राज्यातील सर्व मंदिरांमध्ये वस्त्रसंहिता लागू करण्यास प्रेरणा मिळेल.

वर्ष २०२२ मध्ये समितीने प्रशासनाला दिलेल्या निवेदनात म्हटले होते की, मुरुडेश्वर मंदिरात दर्शनासाठी येणार्या भाविकांनी त्यांचा पोशाख मंदिराच्या पवित्र वातावरणाशी सुसंगत असल्याची निश्चिती केली पाहिजे. पाश्चात्त्य किंवा अल्प कपडे परिधान केलेल्या व्यक्तींना प्रवेश देऊ नये. भारतीय पारंपरिक पोशाख परिधान केलेल्यांनाच आत प्रवेश द्यावा.
Dress Code Implemented at the Famous Murudeshwar Temple in Uttara Kannada District
From now on, wearing Western-style short clothes, obscene, or indecent attire will not be allowed.
Devotees must wear traditional Hindu attire when visiting the temple.
(1/2) pic.twitter.com/m6ftVAdoBS— 🚩Mohan Gowda🇮🇳 (@MohanGowda_HJS) June 23, 2025
कर्नाटकात २५० हून अधिक मंदिरांत वस्त्रसंहिता लागू !
श्री. गौडा पुढे म्हणाले की, विविध संघटनांच्या सामूहिक प्रयत्नांचा हा परिणाम आहे. यापूर्वी समितीच्या अशाच आवाहनानंतर हंपीमधील जगप्रसिद्ध विरुपाक्ष मंदिर आणि शृंगेरीमधील शारदांबा मंदिर यांसह कर्नाटकातील २५० हून अधिक मंदिरांनी वस्त्रसंहिता यशस्वीरित्या लागू केली आहे.
अवैध प्रवासी वाहतूक करणार्या मालवाहू वाहनांचे परवाने कायमचे रहित करणार ! – प्रताप सरनाईक, परिवहनमंत्री
‘लव्ह जिहाद’च्या आंतरराष्ट्रीय षड्यंत्राच्या प्रकरणी १४ जणांविरुद्ध दोषारोपपत्र सादर !
मयंक लोहार हत्याप्रकरणी सरकार विधानसभेत निवेदन करणार !
धर्म लपवून विवाह केल्याने तो अवैध ठरला, तरी पीडितेला पोटगी मिळण्याचा अधिकार ! : Madhya Pradesh High Court
केरळ : अल्पवयीन मुलांना मारहाण करणार्या ख्रिस्ती पाद्रीविरुद्ध संतप्त नागरिक रस्त्यावर !
गाझियाबाद (उत्तरप्रदेश) येथे डॉक्टर नदीमने कापली रुग्णाची चुकीची नस !