उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली दैवी (सात्त्विक) बालके म्हणजे पुढे हिंदु राष्ट्र (सनातन धर्म राज्य) चालवणारी पिढी ! कु. सोहम् बंटीकुमार चव्हाण हा या पिढीतील एक आहे !

‘वर्ष २०१९ मध्ये ‘कु. सोहम् बंटीकुमार चव्हाण उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आला असून त्याची आध्यात्मिक पातळी ५३ टक्के आहे’, असे घोषित करण्यात आले होते. वर्ष २०२५ मध्ये त्याची आध्यात्मिक पातळी ५४ टक्के झाली आहे. त्याच्यावर पालकांनी केलेले योग्य संस्कार, त्याची साधनेची तळमळ आणि त्याच्यातील भाव यांमुळे आता त्याची साधनेत प्रगती होत आहे.’
– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले (१६.६.२०२५)
‘सनातनमध्ये आलेल्या दैवी बालकांमुळे ‘मी साधकांना तयार केले’, असा अहंभाव माझ्यात निर्माण झाला नाही.’
– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले
पालकांनो, हे लक्षात घ्या !
‘तुमच्या मुलात अशा तर्हेची वैशिष्ट्ये असली, तर ‘ते उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेले आहे’, हे लक्षात घेऊन ते मायेत अडकणार नाही, उलट त्याच्यावर साधनेला पोषक होतील, असे संस्कार करा. त्यामुळे त्याच्या जन्माचे कल्याण होईल आणि तुमचीही साधना होईल.’
– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

१. साधी रहाणी
‘कु. सोहम्ची रहाणी साधी आहे. त्यामुळे त्याला काही वेळा शाळेतील मुले त्रास देतात. तेव्हा सोहम् शांत रहातो. तो घरी आल्यावर मला शाळेत घडलेला प्रसंग सांगतो आणि ‘‘मी (सोहम्) योग्य प्रकारे वागलो का ?’’, असेही मला विचारतो.
२. लहान मुलांशी जवळीक साधणे
मागील वर्षी आम्ही रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात सेवेनिमित्त गेलो होतो. तेव्हा सोहम्ने तेथील लहान मुलांशी सहजतेने जवळीक साधली.
३. स्वावलंबी
‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवा’त काही कारणांमुळे आम्हा कुटुंबियांना वेगळी आणि त्याला वेगळी खोली मिळाली. तेव्हा तो म्हणाला, ‘‘मी अन्य साधकांच्या समवेत राहू शकतो. मी सर्व करू शकतो.’’
४. तो व्यष्टी साधनेचा आढावा नियमित देतो.
५. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याप्रती श्रद्धा
त्याची प.पू. डॉ. आठवले यांच्यावर (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्यावर) श्रद्धा आहे. ‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवा’त त्याने प.पू. डॉक्टरांना पाहिल्यावर त्याला पुष्कळ आनंद झाला. सोहम् बसल्या जागेवरून सतत हात जोडून नमस्कार करत होता.
संतांप्रती भाव असलेला कु. सोहम् बंटीकुमार चव्हाण (वय १० वर्षे) !

१. ‘कु. सोहम् नेहमी टिळा लावून शाळेत जातो.
२. मी कारंजाला सत्संग घेण्यासाठी गेल्यावर प्रत्येक सत्संगात सोहम् त्याच्या बहिणींच्या समवेत येतो आणि सत्संग शांतपणे ऐकतो. तो मला आढावा देतो आणि त्याच्याकडून झालेल्या चुकीविषयीही सांगतो.
३. त्याला साधी आणि सात्त्विक रहाणी आवडते.
४. मी कारंजा येथे गेल्यावर मला साधकांना न भेटता पुढे जायचे असेल आणि सोहम्ला याविषयी समजले, तर तो त्याच्या वडिलांच्या समवेत मला भेटायला येतो.’
– पू. अशोक पात्रीकर (सनातनचे ४२ वे (समष्टी) संत, वय ७५ वर्षे) (६.६.२०२५)
६. कु. सोहम्मध्ये जाणवलेले पालट
६ अ. नामजपात वाढ होणे : पूर्वी सोहम् १५ मिनिटे नामजप करत असे. आता तो ३० मिनिटे नामजप करतो. पूर्वी तो त्याच्या शाळेला सुटी असतांना ३० मिनिटे नामजप करत असे. आता तो त्याच्या शाळेला सुटी असतांना १ घंट्याहून अधिक वेळ नामजप करतो.
६ आ. तो नियमित नामजपादी उपाय करतो.
६ इ. सेवा करण्याची आवड निर्माण होणे : तो आम्ही रहात असलेल्या परिसरातील लोकांना सणांची माहिती लिहिलेली हस्तपत्रके देतो. आम्ही रहात असलेल्या परिसरातील लोक सांगतात, ‘‘सोहम्मुळे आम्हाला सर्व सणांची माहिती समजते. तो लहान असूनही किती चांगली सेवा करतो.’’
६ ई. कु. सोहम्मधील उतावळेपणा आणि अव्यवस्थितपणा यांचे प्रमाण उणावले आहे.
६ उ. स्वीकारण्याच्या वृत्तीत वाढ होणे : पूर्वी त्याच्या मनाच्या विरुद्ध काही झाल्यास तो अस्थिर होत असे आणि चिडचिड करत असे. आता तो शांत रहातो आणि सांगितलेले ऐकतो.
७. स्वभावदोष : राग येणे, अव्यवस्थितपणा, मनाने करणे’
– श्री. बंटीकुमार तुळशीराम चव्हाण (कु. सोहम्चे वडील), कारंजा (लाड), वाशिम. (६.६.२०२५)
बालसाधकांमधील विविध दैवी पैलू सहजतेने उलगडणारी चलचित्रे (व्हिडिओज्) आपण इंटरनेटवर ‘यूट्यूब’च्या goo.gl/06MJck मार्गिकेवरही पाहू शकता.
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याप्रती भाव असलेले शिरोडा, गोवा येथील श्री. धर्मा नाईक (वय ७५ वर्षे) !
चित्रपटसृष्टीतील वलयांकित जगाच्या मोहाला न भुलता आयुष्यभर अविरतपणे नाट्यसेवा करणारे प्रामाणिक नाट्यकर्मी ६७ टक्के आध्यात्मिक पातळीचे पद्मश्री (कै.) प्रसाद सावकार !
स्वीकारण्याची वृत्ती असलेल्या आणि तळमळीने अन् भावपूर्ण सेवा करणार्या रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमातील श्रीमती मधु मेहता !
साधकांचा आधारस्तंभ असलेल्या आणि भजनांतून देवाला आळवणार्या ६१ टक्के आध्यात्मिक पातळीच्या नागपूर येथील कै. (सौ.) जयश्री क्षीरसागर (वय ७१ वर्षे) !
घरात आश्रमाची अनुभूती देणारे पलूस (सांगली) येथील बर्गे कुटुंबीय !
उतारवयात आश्रमजीवन सहजतेने स्वीकारणार्या आणि गुरुदेवांप्रती भाव असलेल्या रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमातील ६३ टक्के आध्यात्मिक पातळीच्या श्रीमती सुनंदा शरदचंद्र सामंतआजी (वय ८९ वर्षे) !