
जे.जे. रुग्णालयाच्या वसतीगृहातील विद्यार्थ्याची आत्महत्या !

मुंबई – १० जूनला रात्री १० वाजता भायखळा येथील जे.जे. रुग्णालयाच्या वसतीगृहात एका २२ वर्षीय आधुनिक वैद्यकीय शिक्षण घेणार्या विद्यार्थ्याने आत्महत्या केली. रोहन प्रजापती नावाचा हा विद्यार्थी तिसर्या वर्षात शिकत होता. ‘अभ्यासाच्या ताणामुळे आणि घरातील आर्थिक अडचणींमुळे त्याने हे पाऊल उचलले’, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.
संपादकीय भूमिकाविविध कारणांनी जीवन संपवणारी तरुण पिढी हे सर्व स्तरांवरील आधुनिकीकरणाचे फलित का ? |
‘अलमट्टी’ची उंची वाढू देणार नाही ! – राधाकृष्ण विखे पाटील

मुंबई – अलमट्टी धरणाच्या वाढीसंदर्भात जलसंपदा मंत्री विखे पाटील म्हणाले की, यासंदर्भात सातत्याने चर्चा चालू आहे. अद्यापही सर्वोच्च न्यायालयात त्याला स्थगिती आहे. राज्य सरकारने त्यामध्ये तेलंगाणा आणि आंध्रप्रदेश यांच्यासमवेत चर्चा केलेली आहे. सरकारची भूमिका हीच आहे की कोणत्याही परिस्थितीत अलमट्टीची उंची वाढू द्यायची नाही.
४ वर्षांत २ सहस्र ३४७ प्रवाशांचा मृत्यू ! – रेल्वे पोलीस

मुंबई – गेल्या ४ वर्षांत धावत्या रेल्वेगाडीतून पडून २ सहस्र ३४७ प्रवाशांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती रेल्वे पोलिसांनी माध्यमांना दिली आहे. प्रलंबित रेल्वे प्रकल्प, मुंबईत परप्रांतियांचे वाढते लोंढे, मुंबईजवळील उपनगरांत स्वस्त घरे मिळत असल्याने तिथे वाढलेली लोकसंख्या आदी अनेक कारणांमुळे प्रवाशांची गर्दी वाढली आहे. रेल्वेमार्गिका वाढवल्यास गर्दीचा ताण अल्प होईल, असे रेल्वे प्रवासी संघटनेने म्हटले आहे.
संपादकीय भूमिकाधावत्या रेल्वेतून पडून सहस्रो मृत्यू होऊनही त्याविषयी उपाययोजना न काढणारे रेल्वे प्रशासन असंवेदनशीलच ! |
अनावश्यक गर्भाशय शस्त्रक्रिया नकोत ! – आरोग्यमंत्री

मुंबई – अनावश्यक गर्भाशय शस्त्रक्रिया रोखण्यासाठी गर्भलिंग चिकित्सा आणि निदान दक्षता समितीच्या वतीने आता नियंत्रण ठेवण्यात येणार आहे. महिलांच्या अवैध आणि अनावश्यक गर्भाशय शस्त्रक्रिया करणार्यांची गय केली जाणार नाही, अशी चेतावणी आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिली आहे. बीड जिल्ह्यातील रुग्णालयांत ८४३ ऊसतोड महिला कामगारांच्या गर्भाशयाच्या पिशव्या अवैधरित्या काढल्याचे उघडकीस आल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी वरील चेतावणी दिली आहे.
खड्डे तक्रारीचे ‘पी.एम्.सी. रोड मित्र’ अॅप ४ महिन्यांपासून बंद !
कोस्टल रोडवरील बोगद्यात चारचाकीला आग; वाहने सोडून लोकांचे पलायन !
थोडक्यात महत्त्वाचे (दि : १६ .०७.२०२६)
मुंबई येथे सनातन संस्थेने केलेल्या ‘श्री राजमातंगीदेवी महायज्ञा’च्या संदर्भात सनातन संस्थेच्या हितचिंतकांनी व्यक्त केलेले मनोगत !
एन्.एम्.एम्.टी.च्या इलेक्ट्रिक बसला आग
श्री महालक्ष्मीदेवी मंदिराच्या जतन-संवर्धन कामात भारतीय पुरातत्वीय निकष आणि शास्त्रोक्त संवर्धन पद्धती यांचे काटेकोर पालन व्हावे ! – सकल हिंदु समाजाचे निवेदन