लोह खाणी उभारण्यासाठी वृक्षतोडीचा निर्णय

गडचिरोली : सरकारने येथे १ लाख वृक्ष तोडण्याची अनुमती दिली आहे. येत्या १५ दिवसांत हे वृक्ष तोडण्यात येतील. सरकारच्या या निर्णयामुळे आदिवासी संतप्त आहेत. येथे लोह खाणी उभारण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.
सुरजागड येथे ‘लॉईड्स मेटल्स’ या आस्थापनाने वाढीव उत्खननासाठी राज्य सरकारकडे अनुमती मागितली होती. केंद्र सरकारच्या पर्यावरण मंत्रालयाच्या तज्ञ समितीने गडचिरोली जिल्ह्यातील या आस्थापनाचे लोह खनिज उत्पादन १० दशलक्ष टन प्रति वर्षावरून २६ दशलक्ष टन प्रति वर्षापर्यंतच्या उत्पादन वाढीला हिरवा कंदील दाखवला आहे; पण या वृक्षतोडीच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपिठात अनेक याचिका प्रविष्ट आहेत.
वृक्षतोडीमुळे ९३७ हेक्टरवरील जंगल नष्ट होणार आहे. स्थानिक पर्यावरण आणि आदिवासींचे जीवनमान यांवर गंभीर परिणाम होणार आहे. या भागातील ५० सहस्रांहून अधिक आदिवासींना विस्थापित व्हावे लागेल.
![]() Stop the Cutting of 1.25 Lakh Trees in Gadchiroli – Save Forests, Wildlife, and Tribals |
संपादकीय भूमिकासर्व दृष्टीने विचार करून सरकारने हा निर्णय घेतल्याचे गृहीत धरले, तरी वृक्षतोडीचा परिणाम सभोवतालवर होऊ नये, यासाठी जवळच्या क्षेत्रात वृक्ष लावण्याचे नियोजन केले आहे का ? स्थानिक जनतेने यासंदर्भात सरकारला प्रश्न विचारणे आवश्यक ! |

Farmers’ March Postponed : पंजाबच्या शेतकर्यांचा देहलीमध्ये काढण्यात येणारा मोर्चा पुढे ढकलला
Mohammed Zubair AltNews : (म्हणे) ‘कॉकरोच जनता पक्षा’च्या आंदोलकांनी केलेल्या दगडफेकीत पोलीस घायाळ झाले नाहीत !
Somalians Get Life Imprisonment : नौका कह्यात घेऊन खलाशांना ओलीस ठेवणार्या सोमालियाच्या ४४ नागरिकांना जन्मठेप !
Modi On Paper Leak : प्रश्नपत्रिका फुटीतील दोषींवर कठोर कारवाई केली पाहिजे ! – पंतप्रधान मोदी
Sikkim Tunnel Accident : सिक्किममधील निर्माणाधीन बोगद्यात दरड कोसळली : ८ कामगारांचा मृत्यू
Stray Dogs Attack : भटक्या कुत्र्याच्या आक्रमणात घायाळ झालेल्या मुलीला १ लाख रुपयांची हानीभरपाई देण्याचा आदेश