Goat Sacrifice Ban On Bakri Eid : भीषण दुष्काळामुळे इस्लामी देश मोरोक्कोमध्ये बकरी ईदला प्राण्यांचा बळी देण्यावर बंदी

नागरिकांकडून होत आहे विरोध

राजा महंमद (सहावा)

रबत (मोरोक्को) – आफ्रिका खंडातील इस्लामी देश मोरोक्को देशात बकरी ईदच्या दिवशी बकर्‍यांचा बळी देण्यावर बंदी घातली आहे. राजा महंमद (सहावा) यांनी देशात गेल्या ६ वर्षांपासून चालू असलेल्या भीषण दुष्काळामुळे बकरी ईदला बकर्‍यांच्या बळी देणे पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. मोरोक्कोच्या लोकांनी या निर्णयाला विरोध केला आहे. त्याच वेळी या निर्णयामुळे ‘धार्मिक विधी थांबवण्याचा सरकार किंवा राजा यांना अधिकार आहे कि नाही ?’, यावरही चर्चा होत आहे.

सरकारच्या आदेशानंतर अधिकार्‍यांनी बळी देण्यासाठी आणालेल्या बकर्‍या जप्त करण्यात येत आहेत. यामुळे लोक रस्त्यावर उतरून निषेध करत आहेत.