|

छत्रपती संभाजीनगर – शहरातील बजाजनगर येथील उद्योजक संतोष लड्डा यांच्या घरी १० कोटी रुपये असल्याची माहिती त्यांच्याच वर्गमित्राने दिल्याचे पोलीस अन्वेषणात निष्पन्न झाले आहे. पोलिसांनी लड्डा यांच्या आस्थापनात काम करणारा त्यांचा वर्गमित्र बाळासाहेब इंगोलेंसह ४ जणांना अटक केली आहे. न्यायालयाने आरोपींना ६ जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. आस्थापनाचा अवमान केल्यामुळे दुखावलेल्या इंगोले याने लड्डा यांच्या घरातील संपत्तीची माहिती दरोडेखोरांना दिली होती. या प्रकरणात ३१ मे या दिवशी अटक केलेल्या उर्वरित आरोपींमध्ये महेश गारोडे, गणेश गोराडे, अजिनाथ जाधव यांचा समावेश आहे.
उद्योजक संतोष यांच्या बंगल्यावर १५ मेच्या पहाटे ६ दरोडेखोरांनी दरोडा घातला. या दरोड्यात साडेपाच किलो सोने, ३२ किलो चांदी आणि ७० सहस्र रुपयांचा माल दरोडेखोरांनी पळवला होता. या प्रकरणी वाळूज एम्.आय.डी.सी. पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद होऊन त्याचे अन्वेषण गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आले होते. या दरोड्यात कुख्यात गुन्हेगार योगेश हाजबे, सुरेश उपाख्य सूर्यकांत गंगणे, सय्यद अजहरोद्दीन सय्यद कबिरोद्दीन, सोहेल जलील शेख, महेंद्र बिडवे यांना गुन्हे शाखेने अटक केली आहे. या दरोड्याचा मुख्य सूत्रधार अमोल खोतकर याचा गेल्या आठवड्यात साजापूर शिवारात गुन्हे शाखेने केलेल्या गोळीबारात मृत्यू झाला होता. पोलिसांनी अटक केलेले आरोपी सध्या १४ दिवसांच्या पोलीस कोठडीत आहेत. त्यांची कसून चौकशी चालू आहे.
उच्चस्तरीय चौकशी समिती नेमणार्या आयुक्त डॉ. मंजिरी मनोळकर यांचे स्थानांतर
नक्षली कारवायांमुळे उपेक्षित गडचिरोलीतील २२ ठिकाणी होणार ‘आपले सरकार सेवा केंद्रे’
पुणे विभागात ३७ लाख रुपयांचा भेसळयुक्त अन्नसाठा कह्यात
थोडक्यात महत्त्वाचे (दि : १७.०७.२०२६)
मोशी दुर्घटनेप्रकरणी मुख्य आणि कार्यकारी अभियंते निलंबित !
दिघी (पुणे) पोलीस ठाण्यातील महिला पोलीस उपनिरीक्षकास लाच घेतांना अटक !