
बेंगळुरू (कर्नाटक) – काँग्रेसचेच ज्येष्ठ नेते आणि प्रशासकीय सुधारणांविषयीच्या आयोगाचे अध्यक्ष आर्.व्ही. देशपांडे यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त ‘एक्स’वर पोस्ट करत गौरवोद्गार काढल्यानंतर २ घंट्यांनी ती पोस्ट हटवली. पोस्ट केल्यानंतर सामाजिक माध्यमांवर अनेकांनी यावर प्रतिक्रिया व्यक्त करतांना ‘देशपांडे यांचे शरीर जरी काँग्रेसमध्ये असले, तरी आत्मा भाजपमध्ये आहे. अशा आत्म्यांचे काँग्रेसमध्ये प्रमाण पुष्कळ आहे’, अशा विधाने करण्यात येऊ लागल्यानंतर त्यांनी पोस्ट हटवली.
१. माजी मंत्री श्री. आर्. व्ही. देशपांडे यांनी ‘एक्स’वर पोस्ट करत म्हटले होते, ‘आपले संपूर्ण जीवन स्वातंत्र्यसंग्रामासाठी अर्पण केलेल्या भारतमातेचे क्रांतीकारी सुपुत्र विनायक दामोदर सावरकर यांना जयंतीनिमित्त शतशः नमन. युवकांमध्ये देशभक्तीची ज्वाला पेटवणारे, स्वाभिमान आणि स्वातंत्र्याचे महत्त्व सांगणारे हे एक अभूतपूर्व भक्त होते.’
२. लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी, काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्यासह अनेक काँग्रेस नेते सातत्याने स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावर टीका करत असतात. अशा पार्श्वभूमीवर देशपांडे यांची पोस्ट चर्चेचा विषय ठरली.
संपादकीय भूमिकाकाँग्रेसमध्येही सावरकरभक्त आहेत; मात्र सत्तेचा स्वार्थ, तत्त्वनिष्ठतेसाठी संघर्ष करण्याची सिद्धता नसणे, कचखाऊ भूमिका आदींमुळे ते प्रखर देशभक्ताचा काँग्रेसकडून होणारा अवमान स्वीकारून स्वतःचीही नैतिकता घालवून बसले आहेत ! |
Russian Missile Attack : भारताने रशियाच्या राजदूताला बोलावून निषेध नोंदवला !
CJP Protest : ‘न्यायालयाला यात ओढू नका’, असे सांगत तातडीने सुनावणी करण्यास न्यायालयाचा नकार
हत्येच्या घटनेला विरोध करणार्याविरुद्ध नोंदवलेल्या गुन्ह्याला कर्नाटक उच्च न्यायालयाकडून स्थगिती !
जन्महिंदूंना कर्महिंदू, जागृत हिंदू आणि संघटित हिंदू बनवूया ! – शंभू गवारे, हिंदु जनजागृती समिती
मुंबई, पुणे आणि नागपूर यांसह अनेक शहरांत तरुणांचे आंदोलन !
Mumbai Police : मुंबईत २३ जुलैपासून ६ ऑगस्टपर्यंत जमावबंदी