
मुंबई, २१ मे (वार्ता.) – छत्रपती शाहू महाराजांच्या कारकीर्दीमध्ये वर्ष १६९५ ते १७५५ या कालावधीत मराठा सैन्यात राहून पराक्रम गाजवणारे सेनापती रघुजी भोसले (प्रथम) यांची लंडनमध्ये असलेली तलवार संपादन करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने ६९ लाख ९४ सहस्र ४३७ रुपये संमत केले आहेत. लंडनमध्ये झालेल्या लिलावामध्ये प्रवीण चल्ला या भारतीय व्यक्तीने ही तलवार लिलावामध्ये खरेदी केली. ते ही तलवार महाराष्ट्र शासनाला देण्यास सिद्ध आहेत. यासाठी लागणारा निधी पर्यटन विभागाकडून दिला जाणार असून ही तलवार राज्य पुरातत्व विभागाकडे रहाणार आहे.
रघुजी भोसले यांचा थोडक्यात परिचय !
रघुजी भोसले (प्रथम) हे नागपूर येथील भोसले घराण्याचे संस्थापक आहेत. बंगालच्या नवाबाविरुद्ध लष्करी मोहीम राबवून मराठा साम्राज्याचा विस्तार त्यांनी बंगाल ते ओडिशापर्यंत केला. रघुजी राजे यांनी त्यांच्या पराक्रमाद्वारे दक्षिण भारतामध्ये मराठ्यांचे वर्चस्व प्रस्थापित केले. त्यांचे शौर्य आणि पराक्रम यांवर खुश होऊन छत्रपती शाहू महाराज यांनी रघुजीराजे भोसले यांना ‘सेनासाहेबसुभा’ ही पदवी दिली होती.
थोडक्यात महत्त्वाचे (दि : १५.०७.२०२६)
हॉटेलवर कारवाई करणार्या पोलिसाचे निलंबन रहित !
चाकण (पुणे) येथील साहाय्यक पोलीस निरीक्षकाने मागितली १० लाख रुपयांची लाच
मासेमारांना खोल समुद्रातील संपर्कासाठी ‘सॅटेलाईट फोन’ उपलब्ध होण्यासाठी सरकारचे प्रयत्न !
एस्.टी.च्या ७८ व्या वर्धापनदिनानिमित्त परिवहनमंत्र्यांकडून राज्यव्यापी वृक्षारोपण अभियानाचा शुभारंभ !
कंत्राटदाराला ५ लाख रुपये, तर सल्लागार संस्थेला २ लाख रुपयांचा दंड !