महाराष्ट्र मंदिर महासंघाच्या मागणीला यश !
(वस्त्रसंहिता म्हणजे मंदिरात घालून यायच्या वस्त्रांविषयीचे नियम)

कोल्हापूर, १३ मे (वार्ता.) – कोट्यवधी हिंदूंचे श्रद्धास्थान असलेले श्री महालक्ष्मीदेवी मंदिर, तसेच जोतिबा मंदिर येथे ‘पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समिती’च्या वतीने वस्त्रसंहिता लागू करण्यात आली आहे. मंदिरात भाविकांनी दर्शनासाठी येतांना, तसेच धार्मिक विधीच्या अनुषंगाने येतांना तोकडे कपडे न घालता पारंपरिक कपडे परिधान करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या संदर्भात ३० मार्च या दिवशी श्री महालक्ष्मीदेवी मंदिराचे व्यवस्थापक श्री. अनिल दिंडे यांना ‘महाराष्ट्र मंदिर महासंघा’च्या वतीने निवेदन देण्यात आले होते. त्यावर प्रशासनाने सकारात्मक निर्णय घेतला आहे. या संदर्भात विविध माध्यमांच्या प्रतिनिधींनी भाविकांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या असता सर्वांनी सकारात्मक प्रतिसाद देत वस्त्रसंहिता आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले.
पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीचे अभिनंदन ! – महाराष्ट्र मंदिर महासंघकोल्हापूर – कोट्यवधी हिंदूंचे श्रद्धास्थान असलेले श्री महालक्ष्मी मंदिरात, तसेच जोतिबा मंदिरात ‘पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समिती’च्या वतीने वस्त्रसंहिता लागू करण्यात आली आहे. मंदिरे ही हिंदु धर्माची आधारशीला असून मंदिरे ही ईश्वरी चैतन्याचा स्रोत असून भाविक आणि भक्त यांना मनःशांती प्रदान करणारी अन् अव्याहतपणे आध्यात्मिक ऊर्जा पुरवणारी केंद्रे आहेत. हिंदु धर्म आणि हिंदु संस्कृती यांच्या रक्षणासाठी अन् हिंदूंच्या जीवनाचा अविभाज्य घटक असणार्या मंदिरांचे पावित्र्य जपणे अत्यंत आवश्यक आहे. त्यादृष्टीने पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीने घेतलेला निर्णय हा स्तुत्य आहे, असे प्रसिद्धीपत्रक महाराष्ट्र मंदिर संघाच्या वतीने देण्यात आले आहे. ![]() मंदिर महासंघाचे संयोजक श्री. प्रमोद सावंत, सहसंयोजक श्री. अभिजित पाटील आणि समन्वयक श्री. प्रसाद कुलकर्णी यांनी दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, मंदिरातील सात्त्विकता अधिक ग्रहण करायची असेल, तर आचरण आणि वेशभूषा सात्त्विक हवी. वस्त्रसंहितेचा उद्देश भारतीय संस्कृतीच्या परंपरेला साजेशी वस्त्रे परिधान करावेत हा आहे. आधुनिकतेकडे वळतांना वस्त्रसंहितेसंदर्भात पालन व्हावे, या दृष्टीने महासंघाच्या वतीने निवेदन देण्यात आले होते. त्यावर मंदिर प्रशासनाने सकारात्मक निर्णय घेतला. मुंबई येथील श्री सिद्धीविनायक मंदिर आणि जेजुरी येथील श्री खंडोबा मंदिरात वस्त्रसंहिता लागू झाली असून कोल्हापूर जिल्ह्यातील अन्य मंदिरांनीही वस्त्रसंहिता लागू करावी, अशी मागणी आम्ही करत आहोत. |

हिंदु राष्ट्र समन्वय समितीच्या मागणीला शिक्षण खात्याचा सकारात्मक प्रतिसाद !
हिंदूंच्या तीव्र विरोधानंतर कलाकाराकडून क्षमायाचना !
शाळांमध्ये अतिरेकी आणि राष्ट्रविरोधी विचारसरणीला थारा नसावा ! – नितीन फळदेसाई
मुंबईत ‘डबेवाले’ बांधवांच्या सन्मानार्थ वैद्यकीय पडताळणी आणि पाद्यपूजा !
भारतात अवैधरित्या वास्तव्यास असलेला अमेरिकेचा माजी सैनिक कह्यात
गोव्यातील औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधील सुधारणांसाठी १८० कोटी रुपयांची गुंतवणूक करणार ! – मुख्यमंत्री डॉ. सावंत