
मुंबई – राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेने निकाल देण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाकडे ३१ जुलैपर्यंतची वेळ मागितली आहे. त्यामुळे ३१ जुलैला या प्रकरणाचा निकाल लागण्याची शक्यता आहे. मालेगाव बाँबस्फोट प्रकरणातील सर्व आरोपींना या दिवशी न्यायालयात उपस्थित रहाण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत.
१९ एप्रिल या दिवशी या प्रकरणाची सुनावणी पूर्ण झाली. ३१ ऑगस्टपर्यंत निकाल घोषित करण्यास मुदतवाढ देण्यात आली होती. ३२३ पैकी ३२ जणांनी त्यांची साक्ष परत घेतली आहे.
प्रज्ञा सिंह यांचे अधिवक्ता मिश्रा यांनी सांगितले की, खोटा मकोका लावण्यात आला. ९ वर्षे कारागृहात ठेवण्यात आले. हे सर्व आतंकवादविरोधी पथकाने केले. ३१ जुलैला निकाल येईल, तेव्हा कसे फसवण्यात आले आहे, ते सर्व जगाला लक्षात येईल.
| ‘सत्यमेव जयते’वर माझा विश्वास ! – साध्वी प्रज्ञासिंह
‘सत्यमेव जयते’वर माझा विश्वास आहे. एक लाखांहून अधिक पाने आहेत. मोठा खटला आहे. कुणावर अन्याय होता कामा नये, असे न्यायाधिशांनी सांगितले. आतंकवादी पथकाला त्याच दिवशी माझी मान मुरगळणे शक्य झाले असते. त्यांचे माझ्याशी इतके शत्रुत्व का आहे हे कळत नाही. धर्मांधांसाठी मी त्यांची शत्रू आहे आणि नेहमी राहीन. जे देशविरोधी आहेत, गद्दार आहेत, त्यांची मी शत्रू आहे. |
काय आहे प्रकरण ?
२९ सप्टेंबर २००८ या दिवशी मालेगावमध्ये झालेल्या बाँबस्फोटात ६ जणांचा मृत्यू झाला होता आणि १०१ जण घायाळ झाले होते. वर्ष २०११ मध्ये हे प्रकरण राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेकडे गेले होते. पूर्वी साध्वी प्रज्ञा यांना क्लिनचीट देण्यात आली होती; परंतु नंतर राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेने मुंबई विशेष न्यायालयात याचिका प्रविष्ट करून आरोपी निर्दाेष असल्याचे चुकीचे असल्याचे सांगू त्यांना कडक शिक्षा झाली पाहिजे, असे सांगितले होते.
जोगेश्वरीमध्ये ११ लाख रुपयांचा विनालेबल साबण जप्त !
महाराष्ट्र विधीमंडळ स्वीकारणार केंद्रशासनाने विकसित केलेली ‘एकात्मिक डिजिटल प्रणाली’ !
FIR Against Kunal Kamra : विनोदी कलाकार कुणाल कामरा याच्याविरुद्ध हिंदूंच्या भावना दुखावल्याच्या प्रकरणी तक्रार !
निष्क्रीय इच्छामरणाचा निर्णय घेण्यासाठी महाराष्ट्रात होणार समित्यांची स्थापना !
Badrinath Temple Arrest : बद्रीनाथ मंदिरातील दान चोरीच्या प्रकरणी मंदिराच्या माजी अधिकार्याला अटक
Kerala High Court Orders Waqf Board : केरळ उच्च न्यायालयाकडून राज्य वक्फ बोर्डाला नीतीविषयक निर्णय घेण्यास बंदी