मारहाण करणार्‍या मुसलमान महिलेचे नाव लपवून पीडित हिंदु महिलेचे नाव मात्र छापले !

वृत्तपत्रांच्या इस्लामधार्जिण्या वृत्तीवर वाचक अप्रसन्न !

मुंबई – अवंतिका एक्सप्रेसमध्ये रूद्राक्षाची माळ घातल्याने एका हिंदु महिलेला मुसलमानांकडून मारहाण करण्यात आली. याविषयीचे वृत्त दैनिक ‘लोकसत्ता’ आणि ‘पुढारी’ यांनी त्यांच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केले. यामध्ये पेशाने अधिवक्त्या असणार्‍या हिंदु महिलेचे नाव या वृत्तपत्रांनी उघड केले, तर मुसलमान महिलेचे नाव उघड न करता केवळ ‘अल्पसंख्यांक समाजातील महिलेने मारहाण केली’, असे लिहिले. यातून वृत्तपत्रांची इस्लामधार्जिणी वृत्तीच दिसून येते. ‘अल्पसंख्यांक समाज’ असा उल्लेख करून त्या समाजाला समर्थन देत त्या समाजाच्या आरोपींची अप्रत्यक्षरित्या पाठराखण केल्याचेच यावरून दिसून येते. अल्पसंख्यांकाचा केला जाणारा उदोउदो, हा बहुसंख्यांकांवरील अन्यायच आहे. हिंदूबहुल भारतात असे होणे अपेक्षित नाही.

लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ म्हणवणार्‍या वृत्तपत्रांच्या अशा दुटप्पी भूमिकेविषयी वाचकांनी अप्रसन्नता व्यक्त केली आहे.

संपादकीय भूमिका

अशी पत्रकारिता समाजाला काय दिशा देणार ?