हिंदु कुटुंबाकडून ‘आम्ही हिंदु आहोत आणि हिंदूच रहाणार’, असे बाणेदार उत्तर !
शिरूर (जिल्हा पुणे) – पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार १ मे या दिवशी राहुल गायकवाड हे त्यांच्या कुटुंबासह उचाळेवस्ती (टाकळी-हाजी) येथे घरासमोर बसलेले होते. त्या वेळी प्रकाश जालिंदर घोडे हे ६ अनोळखी व्यक्तींसमवेत राहुल गायकवाड यांच्या घरी आले. त्यांनी तुम्ही कोणत्या धर्माचे आहात ?, अशी विचारणा केली, तसेच त्यांना ‘तुम्ही बायबल वाचा, चर्चमध्ये जा, येशूची कृपा होईल, आर्थिक लाभ होईल’, असे सांगत धर्मांतर करण्यासाठी दबाब आणण्याचा प्रयत्न केला. त्या वेळी गायकवाड कुटुंबियांनी खंबीरपणे ‘आम्ही हिंदु आहहोत आणि हिंदूच रहाणार’, असे उत्तर बाणेदारपणे दिले.
🚨 Shirur, Maharashtra: Christian bigots accused of pressuring a Hindu family to convert! FIR Filed against seven
But the family stood strong:
"We are Hindus and will remain Hindus!" 🙏🕉️This incident shows why India needs a tough anti-conversion law—not just for converters,… pic.twitter.com/8VGoLbpXtc
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) May 4, 2025
तुमच्या देवांनी तुमच्यासाठी काय केले ? तुमच्या देवांमुळे तुम्हाला काही लाभ झाला का ?, असे प्रश्न विचारत त्यांनी घरातील श्री काळूबाई, जगद्गुरु नरेंद्राचार्यजी महाराज यांच्या प्रतिमांकडे बोट दाखवत अपमानास्पद भाष्य केले. यासह ‘तुम्ही ख्रिस्ती झालात अन् चर्चमध्ये आलात, तर तुमचे सर्व आजार बरे होतील, तुम्हाला आर्थिक साहाय्य होईल’, असे आमीष दाखवले.
या प्रकारामुळे गायकवाड कुटुंबियांनी तात्काळ ११२ क्रमांकवर संपर्क करून पोलिसांना बोलावले. पोलिसांनी सातही जणांना अटक केली असून शिरूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवला आहे. या प्रकरणी आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी केली आहे.
संपादकीय भूमिका
|