साई संस्थानला अज्ञाताकडून धमकीचा ई-मेल !

शिर्डी – लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असणार्या शिर्डीतील ‘श्री साईबाबा समाधी मंदिर’ ‘पाईप बाँब’ने उडवून देण्याची धमकी देणारा ई-मेल मिळाला आहे. ३ मे या दिवशी सकाळी अज्ञात व्यक्तीने ई-मेलद्वारे ही धमकी दिली आहे. हा ई-मेल नेमका कुणी पाठवला ? आणि कुठून आला ?, याचा शोध चालू आहे. याविषयी शिर्डी संस्थान आणि शिर्डी पोलीस यांनी अधिक माहिती देण्यास नकार दिला आहे. या प्रकरणी मंदिर सुरक्षा प्रमुख पोलीस उपनिरीक्षक रोहिदास माळी यांनी शिर्डी पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट (दाखल) केली आहे. या धमकीमुळे भाविकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
🚨 Shirdi Alert: Shri Saibaba Temple receives bomb threat via anonymous email.
Repeated threats to Hindu temples show a worrying lack of fear toward law enforcement and security forces.
Strict action is a must!#HindusUnderAttack@indiatvnews pic.twitter.com/RuF48jAerG
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) May 4, 2025
श्री साईबाबा समाधी मंदिर परिसरामध्ये सुरक्षा यंत्रणा कडक करण्यात आली आहे. साई संस्थानला यापूर्वीही असे धमकीचे ई-मेल आले होते. त्याच्या अन्वेषणातून ते खोटे असल्याचे निष्पन्न झाले होते. केंद्रीय जलशक्ती मंत्री सी.आर्. पाटील यांनी नुकतेच साई बाबा समाधीचे दर्शन घेतले होते. त्यांनी आतंकवादी आक्रमणाला कसे उत्तर दिले जाणार ? यावर ‘आता केवळ अॅक्शन (कृती) पहा’, असे सूचक विधान केले होते. हा दौरा झालयानंतर काही घंट्यांमध्ये धमकीचा ई-मेल आला.
संपादकीय भूमिकाहिंदूंच्या मंदिरांना अशा धमक्या मिळणे, हे पोलिसांसह सुरक्षा यंत्रणांचा धाक अल्प झाल्याचे द्योतक ! |
FIR Against Kunal Kamra : विनोदी कलाकार कुणाल कामरा याच्याविरुद्ध हिंदूंच्या भावना दुखावल्याच्या प्रकरणी तक्रार !
निष्क्रीय इच्छामरणाचा निर्णय घेण्यासाठी महाराष्ट्रात होणार समित्यांची स्थापना !
Badrinath Temple Arrest : बद्रीनाथ मंदिरातील दान चोरीच्या प्रकरणी मंदिराच्या माजी अधिकार्याला अटक
Kerala High Court Orders Waqf Board : केरळ उच्च न्यायालयाकडून राज्य वक्फ बोर्डाला नीतीविषयक निर्णय घेण्यास बंदी
Amir Khan : (म्हणे) ‘मी सोनम वांगचूक यांना ‘थ्री इडियट्स’ चित्रपटापूर्वी भेटलोच नव्हतो !’
Nagpur Police : वाहतूक पोलिसांना बंदूक बाळगणे बंधनकारक !