Shri Krishna Janmabhoomi Case: श्रीकृष्णजन्मभूमी प्रकरणी केंद्र सरकार आणि पुरातत्व विभाग यांना पक्षकार बनवणे योग्य ! – सर्वोच्च न्यायालय

मथुरा (उत्तरप्रदेश) – मथुरा येथील श्रीकृष्णजन्मभूमी आणि शाही ईदगाह वादात केंद्र सरकार अन् भारतीय पुरातत्व विभाग यांना पक्षकार बनवण्याची अलाहाबाद उच्च न्यायालयाची हिंदु पक्षकारांना देण्यात आलेली अनुमती पहिल्या दृष्टीक्षेपात योग्य वाटते, असे सर्वाेच्च न्यायालयाने म्हटले आहे. अलाहाबाद उच्च न्यायालयाने ५ मार्च २०२५ या दिवशी २ प्रकरणांमध्ये सुधारणा करण्यास अनुमती दिली होती. उच्च न्यायालयाने याचिकाकर्त्यांना केंद्रीय गृह मंत्रालय आणि पुरातत्व विभाग यांना प्रतिवादी बनवण्याची अनुमतीही दिली होती. उच्च न्यायालयाच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले होते.

सध्या श्रीकृष्णजन्मभूमीच्या संदर्भात वेगवेगळ्या पक्षांकडून १५ हून अधिक प्रकरणे न्यायालयात प्रलंबित आहेत.