
शिर्डी – साईबाबा संस्थानच्या वतीने १० एप्रिल ते २६ एप्रिलपर्यंत साईबाबांच्या मूळ चर्मपादुकांच्या दर्शन सोहळ्याचे आयोजन केले आहे. दक्षिण भारतातील ८ शहरांत या चर्मपादुका भाविकांना दर्शनासाठी नेण्यात येणार आहेत. शिर्डीतील साई संस्थांनचे अधिकारी, सुरक्षारक्षक, तसेच साई मंदिरातील पुजारी असा २० कर्मचार्यांचा सोहळ्यात सहभाग असेल. शिर्डी येथील साई मंदिरात पादुकांची विधीवत् पूजा करून या पादुका रवाना झाल्या. कर्नाटक आणि तमिळनाडू या राज्यांतही चर्मपादुकांचा दर्शनसोहळा होणार आहे. शिर्डी येथे साईबाबांच्या मंदिरात जे कार्यक्रम होतात, तसेच कार्यक्रम पादुका सोहळ्याच्या वेळीही होणार आहेत.
मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपिठाने साईबाबा संस्थानवर ३ सदस्य समिती नेमली आहे. या समितीने साईबाबांनी वापरलेल्या सव्वाशे वर्षांपूर्वीच्या मूळ चर्मपादुका भाविकांना दर्शनासाठी शिर्डीबाहेर घेऊन जाण्याचा निर्णय घेतला. कायदेशीर गोष्टींची पूर्तता साई संस्थानाने केली असल्याची माहिती संस्थांनचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी दिली.
हिंदूविरोधी ‘देवस्थान इनाम जमीन निर्मूलन अधिनियम’ रहित करावा !
Monsoon Reached Keralam : मौसमी पावसाचे केरळम्मध्ये आगमन !
‘हाफकीन’ आणि घाना सरकार यांच्यात सर्पदंशावरील उपचारपद्धतीसह अन्य संशोधनासाठी सहकार्य करार होणार !
आरोपी शाहिना रफिक हिला पुण्यात अन्वेषणासाठी बोलावले
तुमकुरू (कर्नाटक) येथे श्रीराममंदिराच्या शेजारी अल्पसंख्यांकांचे वसतीगृह बांधण्याचा डाव !
‘दारुल उलूम देवबंद’ आतंकवाद्यांचे केंद्र असल्याने ते भुईसपाट करा ! – हिंदु रक्षा दलाची मागणी