Karnataka Budget 2025 : अल्पसंख्यांकांना विवाहासाठी ५० सहस्र रुपयांचे साहाय्य घोषित ! – मुख्यमंत्री सिद्धरामय्या, कर्नाटक

कर्नाटकातील काँग्रेस सरकारचे मुसलमानप्रेम !

मुख्यमंत्री सिद्धरामय्या

बेंगळुरू (कर्नाटक) – कर्नाटकातील काँग्रेस सरकारचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी ७ मार्च २०२५ या दिवशी राज्याचा अर्थसंकल्प सादर केला. यामध्ये विविध योजना आणि प्रकल्प यांच्यासाठी कोट्यवधी रुपयांचे प्रावधान करतांनाच अल्पसंख्यांक कुटुंबांना विवाहासाठी ५० सहस्र रुपयांचे साहाय्य करण्याची घोषणा केली. तसेच सरकारकडून जैन पुजारी, शिखांचे मुख्य ग्रंथी आणि मशिदींचे इमाम यांचे मानधन प्रतिमहा ५ सहस्रांवरून ६ सहस्र रुपये करण्यात आले आहे.

वक्फ मालमत्तांच्या दुरुस्तीसाठी १५० कोटी रुपये !

वक्फ मालमत्तांची दुरुस्ती आणि नूतनीकरण, पायाभूत सुविधा प्रदान करणे अन् मुसलमानांच्या कब्रस्तानांचे संरक्षण करण्यासाठी १५० कोटी रुपये देण्यात आले आहेत. (मंदिरांच्या देखभालीसाठी आणि जीर्णाेद्धारासाठी तरतूद न करता वक्फसाठी तरतूद का करण्यात आली ?, याचा जाब कर्नाटकातील हिंदू विचारणार आहेत का ? – संपादक)

संपादकीय भूमिका

धर्मनिरपेक्ष देशात धर्माच्या आधारे सरकारी तिजोरीतून एकाच धर्मियांसाठी पैशांची उधळपट्टी करणारी काँग्रेस राज्यघटनेचा नेहमीच अवमान करत आली आहे. तरीही हिंदू सातत्याने काँग्रेसला निवडून देऊन आत्मघात करत आहेत, हे त्यांच्या केव्हा लक्षात येणार ?