Karnataka Muslims Appeasement : सरकारी कामांच्या कंत्राटांमध्ये मुसलमानांना ४ टक्के आरक्षण देण्याचा कर्नाटकातील काँग्रेस सरकारचा निर्णय !

विधानसभेत आणणार विधेयक

कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या

बेंगळुरू (कर्नाटक)  – कर्नाटकातील काँग्रेस सरकारने राज्यातील सरकारी कामांच्या कंत्राटांमध्ये मुसलमानांना ४ टक्के आरक्षण देण्याचा निर्णय घेतला. मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या नेतृत्वाखालील मंत्रीमंडळाच्या बैठकीत या संदर्भातील विधेयकाला संमती देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. विधानसभेच्या चालू असलेल्या अधिवेशनात हे विधेयक मांडले जाण्याची शक्यता आहे.

संपादकीय भूमिका

कोणत्याही माध्यमातून मुसलमानांचे करता येईल तितके लांगूलचालन करण्याचा प्रयत्न काँग्रेसकडून मोहनदास गांधी यांच्या उदयापासून चालू झालेला आहे, तो आजही तसाच चालू आहे. जोपर्यंत भारत काँग्रेसमुक्त होत नाही, तोपर्यंत धर्मनिरपेक्ष राज्यघटना असतांनाही असे निर्णय घेतले जाणार !