कर्म करणे वा न करणे याचा आग्रह नाहीसा केव्हा होतो ?

प.पू. स्वामी वरदानंद भारती

ज्या वेळी माणूस इंद्रियांच्या भोगात आणि कर्माच्या आचरणात आसक्त होत नाही, (तसेच ज्या वेळी) व्यक्तीच्या सर्व प्रकारच्या संकल्पाचा निरास झालेला असतो, तेव्हा त्या वेळी व्यक्तीला ‘योगारूढ’ म्हटले जाते. ज्याला शम साधला, तो योगारूढ होतो. शरिराचे, इंद्रियांचे नियंत्रण, म्हणजे दम आणि मनाचे नियंत्रण म्हणजे शम. अशा रितीने पूर्णावस्था प्राप्त झाल्यानंतर कर्म करण्याविषयीचा वा न करण्याविषयीचा आग्रह नाहीसा होऊन जातो.

– प.पू. स्वामी वरदानंद भारती

(साभार : ग्रंथ ‘आत्मसंयम योग’)