२०८ पैकी ५० प्रकल्पांकडून प्रदूषण नियमांचे पालन

प्रतिकात्मक छायाचित्र

पुणे – येथे मोठ्या प्रमाणात चालू असलेल्या बांधकाम प्रकल्पामुळे धुळीचे प्रदूषण वाढत आहे. (महापालिकेची धूळ प्रदूषण अनुमती न घेता प्रकल्प चालू कसे होतात ? यावर कुणाचा अंकुश कसा नाही ? – संपादक) दीड महिन्यापूर्वी बांधकाम विभागाने प्रकल्पांची पहाणी करून प्रदूषण नियमांचे उल्लंघन करणार्‍या २०८ प्रकल्पांना नोटीस देऊन काम थांबवले होते. २०८ पैकी ५० प्रकल्पांनी प्रदूषणावर उपाययोजना करून काम चालू करण्याची अनुमती मागितली आहे. १५८ बांधकाम प्रकल्पांनी उपाययोजना केलेली नाही. या प्रकल्पांना उपाययोजना करण्याविषयी अहवाल सादर करण्यास सांगितले आहे, अशी माहिती बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता राजेश बनकर यांनी दिली. प्रकल्पाचे काम चालू आहे कि बंद, याची प्रत्यक्ष पडताळणी केलेली नाही. (ही आहे प्रशासनाची कार्यपद्धत ! – संपादक)