पनामा सिटी – अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डॉनल्ड ट्रम्प यांच्या प्रशासनाने सुमारे ३०० अवैध स्थलांतरितांना मध्य अमेरिकी देश पनामा येथील एका हॉटेलमध्ये तात्पुरते कह्यात ठेवले आहे. जोपर्यंत आंतरराष्ट्रीय अधिकारी या अवैध स्थलांतरितांना त्यांच्या देशात परतण्याची व्यवस्था करत नाहीत, तोपर्यंत या स्थलांतरितांना येथे ठेवण्यात येणार आहे.
१. हे अवैध स्थलांतरित भारत, नेपाळ, इराण, अफगाणिस्तान, श्रीलंका, नेपाळ आणि चीन या १० आशियाई देशांतील आहेत. या स्थलांतरितांना थेट या देशांमध्ये पाठवणे अमेरिकेसाठी कठीण आहे. त्यामुळे पनामाचा वापर ‘ट्रान्झिट पॉइंट’ (दोन मार्गांमध्ये मध्यवर्ती असलेले ठिकाण) म्हणून केला जात आहे.
२. पनामाचे संरक्षणमंत्री फ्रँक अब्रेगो यांच्या मते, या स्थलांतरितांना अन्न आणि वैद्यकीय सेवांसह मूलभूत सुविधा पुरवल्या जात आहेत.
३. पनामाचे राष्ट्राध्यक्ष जोसे राउल मुलिनो यांनी १३ फेब्रुवारी २०२५ या दिवशी अवैध स्थलांतरितांना अमेरिकेतून घेऊन आलेल्या विमानाच्या आगमनाची घोषणा केली होती.