रामनाथी (गोवा) येथील सनातनच्‍या आश्रमाला भेट दिल्‍यावर मान्‍यवरांनी दिलेले अभिप्राय !

१. अधिवक्‍त्‍या (सौ.) निकिता  राधे (उच्‍च न्‍यायालय), बेंगळुरू, कर्नाटक.

अ. ‘आश्रमातील एका लहानशा फुलापासून साधकांपर्यंत सर्वांमध्‍ये सौम्‍यता आणि श्रद्धा जाणवते.

आ. प्रत्‍येक जिवामध्‍ये निर्मळ भाव जाणवतो.

इ. मी आश्रमातील ध्‍यानमंदिरात बसले असतांना ‘माझ्‍या डोक्‍यावर गुरुजींचा (परात्‍पर गुरु डॉ. आठवले यांचा) आशीर्वादाचा हात आहे’, असे मला जाणवले.

ई. पृथ्‍वीवरील या आश्रमात मला ब्रह्मांडाची अनुभूती आली.’ (२९.६.२०२४)

२. अधिवक्‍ता कृष्‍णराज व्‍ही. काटवे, धारवाड, कर्नाटक.

अ. ‘मला आश्रमात श्रीकृष्‍णाचे अस्तित्‍व जाणवले.

आ. आश्रमात जर शिबिरे आयोजित केली जात असतील, तर त्यांमध्ये सहभागी होण्यास मी इच्छुक आहे.’ (३०.६.२०२४)

३. एन्. कविता उमापती, मैसुरू, कर्नाटक.

अ. ‘आश्रमात मला शुद्ध भक्‍ती आणि शांती अनुभवायला आली.

आ. ‘हिंदु राष्‍ट्र-स्‍थापनेचे हे कार्य असेच अविरतपणे चालू राहू दे’, अशी मी गुरुदेव आणि ईश्वर यांच्या चरणी प्रार्थना करते.’ (२९.६.२०२४)

४. श्री. राघव एम्. शेठी, म्‍हापसा, गोवा.

अ. ‘येथे सर्वत्र शांतता आहे.

आ. येथील साधक नम्र आहेत.

इ. मला आश्रमात येऊन सेवा करण्‍याची इच्‍छा आहे.’ (२९.६.२०२४)

५. श्री. मुरली मोहन, गोवा

अ. ‘आश्रमात आल्यावर मला एखाद्या मंदिरात आल्याप्रमाणे जाणवले.

आ. ‘मला आश्रमात येऊन सेवा करण्याची संधी मिळावी’, असे वाटते.’ (२९.६.२०२४)