AAP MLA Amanatullah Khan : ‘आप’चे आमदार अमानतुल्ला खान यांच्या विरोधामुळे हत्येतील आरोपी पसार !

  • पोलिसांकडून गुन्हा नोंद

  • पोलिसांना दिली संपवून टाकण्याची धमकी

‘आप’चे आमदार अमानतुल्ला खान

नवी देहली – येथील मुसलमानबहुल जामिया नगरमध्ये पोलीस पथकावर झालेल्या आक्रमणाचे नेतृत्व केल्याबद्दल ओखला मतदारसंघातील आम आदमी पक्षाचे आमदार अमानतुल्ला खान यांच्याविरुद्ध देहली पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे. पोलिसांच्या म्हणण्यानुसार खान यांनी हत्येच्या प्रकरणातील पसार आरोपीला पळून जाण्यास साहाय्य केले. पोलिसांनी नोंदवलेल्या गुन्ह्यात म्हटले आहे की, अमानतुल्ला खान यांनी पोलिसांशी झटापट केली आणि त्यांना धक्काबुक्की केली. यामुळे गुन्हेगार पळून गेला. खान यांनी पोलिसांना धमकी दिली की, हा माझा परिसर असून मी पोलीस आणि न्यायालय यांवर विश्‍वास ठेवत नाही. (मुसलमानबहुल भागात मुसलमान आरोपीला पकडण्यास गेलेल्या पोलिसांवर नेहमीच आक्रमणे होतात. या वेळी त्याचे नेतृत्व  एका मुसलमान आमदारानेच केले. भारतात मुसलमान असुरक्षित आहेत, असे म्हणणारे आता गप्प का ? – संपादक)

१. गुन्हे शाखेचे पथक जामिया परिसरात पसार गुन्हेगार चावेझ याला अटक करण्यासाठी गेले होते. पथकाने चावेझला येथून अटक केली. त्याच वेळी आमदार अमानतुल्ला खान त्यांच्या २०-२५ समर्थकांसह आले आणि पोलिसांना म्हणाले, ‘तुम्ही येथे येण्याचे धाडस कसे केले ? मी अशा पोलीस आणि न्यायालय यांवर विश्‍वास ठेवत नाही.’ (असे म्हणणारी व्यक्ती भारतात आमदार होऊ शकते, यातून भारतीय व्यवस्था किती तकलादू आहे, हे लक्षात येते ! – संपादक)

२. याच वेळी अमानतुल्ला खान आणि त्यांचे समर्थक यांनी पोलिसांवर आक्रमण केले. येथे हाणामारी झाली. पोलिसांचे ओळखपत्र हिसकावून घेण्यात आले. आमदार अमानतुल्ला खान यांनी पोलिसांना धमकी दिली, ‘हा परिसर आमचा आहे. इथून निघून जा, नाहीतर जिवंत बाहेर पडणे कठीण होईल. आमचा आवाज ऐकून इतके लोक जमतील की, तुम्ही कुठे गेला हे कुणालाही कळणार नाही. मी तुमचा गणवेश काढून टाकीन. माझ्यावर दुसरा खटला प्रविष्ट (दाखल) झाला, तरी काही फरक पडत नाही. मी तुम्हाला येथेच संपवेन आणि तुम्हाला साक्षीदारही सापडणार नाहीत.’

३. हा वाद आणि हाणामारी होत असतांना पकडण्यात आलेला गुन्हेगार चावेझ पळून गेला.

संपादकीय भूमिका

  • ‘आप’चे असो अथवा अन्य कुठल्याही पक्षाचे मुसलमान लोकप्रतिनिधी असो, ते गुन्हेगारी वृत्तीच्या धर्मबांधवांना वाचवतात आणि त्यासाठी स्वतःही गुन्हेगारी वृत्ती दाखवतात !
  • पोलिसांना ठार मारण्याची धमकी देणार्‍यांना फाशीचीच शिक्षा होण्यासाठी सरकारने प्रयत्न केले पाहिजेत !