कुंभक्षेत्री सनातन संस्थेच्या प्रदर्शनातून राष्ट्र-धर्माविषयी जागृती !
प्रयागराज, २ फेब्रुवारी (वार्ता.) – महाकुंभनगरी प्रयागराज मध्ये सेक्टर ९ येथे सनातन संस्थेने फलक प्रदर्शन लावले आहे. हे प्रदर्शन पाहिल्यानंतर काही भाविकांनी उत्स्फूर्तपणे मनोगत व्यक्त केले.
१. श्री. सुरज सिंह, बाला, उत्तरप्रदेश : सनातन संस्थेच्या प्रदर्शनातून आपण सर्व हिंदु बांधवांनी राष्ट्र-धर्मासाठी लढणार्या क्रांतीकारकांची माहिती घेऊन स्वतःत देशप्रेम, धर्मप्रेम जागृत करूया आणि भारताला विश्वगुरु करण्यासाठी सर्वांनी संस्थेच्या कार्यात सहभागी होऊया.
२. श्री. लक्ष्मीनारायण कुम्बारिया, पंजाब : गायीचे वासरू ज्या प्रकारे प्रचंड गर्दीतूनही स्वत:च्या आईला शोधते, त्याप्रमाणे माझेही भाग्य आहे की, मी सनातन संस्थेच्या प्रदर्शनात आलो. ‘सनातन’साठी जगणे, हेच आपले जीवन असायला हवे. सनातन धर्म म्हणजे काय आहे ? सनातन धर्म किती व्यापक आहे ? हे प्रदर्शन पाहून सर्वांना निश्चित समजेल. सर्वांनी हे प्रदर्शन निश्चित पहावे.