ठाणे येथे ४ बांगलादेशी महिला, तर घाटकोपरमधून ९ बांगलादेशी अटकेत !

ठाणे – येथे बेेकायदेशीर रहाणार्‍या ४ बांगलादेशी महिलांना अटक केली आहे. त्यांच्याकडे भारतीय असल्याचे कुठलेही पुरावे आढळले नाहीत. उथळसर परिसरात बांगलादेशींना चौकशीविना भाड्याने घर देणार्‍या मालकांच्या विरोधातही पोलीस पथकाने राबोडी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवला आहे; पण त्यांना अटक केलेली नाही. शाजिदा जहीरूद्दीन खातुन (वय ३८ वर्षे), शालीना मलिक मुल्ला (वय ५० वर्षे), रत्ना खोजदिल बिरोश खातुन (वय ४० वर्षे) आणि रेश्मा शहाजहान ढाली (वय ४० वर्षे) अशी घुसखोरांची नावे आहेत.

घाटकोपरमधून ९ बांगलादेशी अटकेत !

मुंबई – मुंबई पोलिसांनी शहरात बेकायदेशीरपणे रहाणार्‍या ९ बांगलादेशींना अटक केली आहे. त्यांच्याकडे बनावट भारतीय कागदपत्रे आढळली आहेत.

संपादकीय भूमिका

महाराष्ट्रात प्रतिदिन बांगलादेशी घुसखोर सापडणे हे भारतीय नागरिकांच्या अस्तित्वासाठी धोकादायक !