१. परशुराम : परशुराम सरसेनापती बनले. संपूर्ण पृथ्वीच्या शासनाची सूत्रे स्वाधीन असतांनाही त्यांचे पर्णकुटीतील जीवन तसेच अखंड होते.

२. चाणक्य : ज्याने ‘अर्थशास्त्र’ हा पृथ्वीमोलाचा ग्रंथ लिहिला, त्या सम्राट चंद्रगुप्ताचे गुरु आणि महामंत्री चाणक्य एका पर्णकुटीत अकिंचन अवस्थेत रहात होते. पर्णकुटीतील त्यांची मालमत्ता म्हणजे छपरावर वाळत असलेल्या गोमयाच्या गोवर्या, अग्निमंथनाची अरणी, यज्ञाचे इंधन आणि समिधा-दर्भ अन् बाहेर वाळत असलेले त्यांचे वस्त्र ! या परमनिःस्पृह चाणक्याने चंद्रगुप्ताच्या राज्याची व्यवस्था लावून आणि चंद्रगुप्ताला भारताच्या सम्राटपदी राज्याभिषेक करून वैदिक धर्मराज्याची प्रतिष्ठापना केली. त्यानंतर मात्र तेे कैलासावर आत्मचिंतनाकरता निघून गेले.
३. राजा हरिहर बुक्क : विजयनगरचे वैदिक साम्राज्य राजा हरिहर बुक्क यांच्या करवी उभे करणारे संन्याशी विद्यारण्य संन्यासधर्माचे काटेकोर पालन करत.
४. समर्थ रामदासस्वामी : छत्रपती शिवाजी महाराजांना महाराष्ट्र राज्याचे स्वामी बनवून, राज्याभिषेक करवून आणि वैदिक धर्माची प्रतिष्ठापना करून समर्थ रामदासस्वामी लंगोटीनिशीच निवृत्त झाले.
(साप्ताहिक ‘सनातन चिंतन’, २०.९.२०१२)
आद्य शंकराचार्य : भारतातील सर्व साम्राज्ये धर्मनियंत्रणाखाली आणणार्या आद्य शंकराचार्यांना सुतळीच्या तोडीचीही अपेक्षा नव्हती.

‘गूगल मॅप’ आणि ज्योतिषशास्त्र
कुत्र्याला श्रीकृष्णाच्या रूपात दाखवणार्या महिलेला जामीन देतांना हिंदूंच्या भावनांचा अनादर करणारा पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाचा निवाडा !
वारकरी संप्रदायाची वेशभूषा
केवळ आध्यात्मिक साधना आणि स्वभावदोष निर्मूलन यांतूनच खरा व्यक्तीमत्त्व विकास शक्य ! – अभिजित पोलके, हिंदु जनजागृती समिती
तुका आकाशाएवढा…
पंढरपूरच्या वारीमध्ये दांभिकांचा मुक्त संचार कशासाठी ?