भारताची तंत्रज्ञान आणि अन्य विषयांतील समृद्धता !

वर्ष १८२० मध्ये जगातील सर्वोत्तम वज्रलोह (स्टील) बनवणारे भारतातील सरगुजा खेडे !

इंग्लंडचे ‘विल्यम अ‍ॅडन्स’ यांच्या वर्ष १८२० च्या सर्वेक्षण अहवालात म्हटले आहे, ‘सहस्रो वर्षे न गंजणारे आणि न झिजणारे जगातील सर्वोत्तम वज्रलोह (स्टील) मध्यप्रदेशातील सरगुजा खेड्यात (सध्या छत्तीसगडमधील जिल्ह्याचे ठिकाण) सिद्ध होते. युरोप आणि डेन्मार्क यांच्यापेक्षाही भारतातील वज्रलोह उत्तम आहे. येथे प्रतिवर्षी ८० ते ९० लक्ष टन वज्रलोह सिद्ध होते. त्यामुळे ‘ईस्ट इंडिया आस्थापना’चे जहाज किंवा शस्त्र यांसाठी आवश्यक वज्रलोह केवळ भारतातून घ्यावे. भारतात सर्वोत्तम शल्य चिकित्सक आणि अभियंते उपलब्ध आहेत. भारत केवळ कृषीप्रधान देश नसून येथे उच्च तंत्रज्ञान उपलब्ध आहे.’ आजही सरगुजामधील ४० लोक हे तंत्रज्ञान जाणतात; पण त्यांचा हा उद्योग कच्च्या मालाअभावी बंद आहे.

– स्वदेशी चळवळीचे प्रणेते स्व. राजीव दीक्षित

लंडनने भारताकडून ‘प्लास्टिक सर्जरी’ शिकून घेणे

वर्ष १७९० मध्ये युद्धात राजा हैदरअलीने इंग्रज अधिकार्‍याचे नाक कापून हातात दिले. एका तरुणाने त्या नाकाची ‘प्लास्टिक सर्जरी’ केली. १५ दिवसांत नाक ठीक झाल्यावर त्याने लंडनला जाऊन त्याविषयी सांगितले. तेथील लोक ‘सर्जरी’ शिकण्यासाठी भारतात आले.

कै. राजीव दीक्षित

६-७ व्या शतकात हिम (बर्फ) सिद्ध करणारा भारत !

राजा हर्षवर्धनच्या राजधानीत हिम (बर्फ) आणि ‘आईस्क्रीम’ बनवायचे २ सहस्र ५०० उद्योगालय भारतात होते. युरोपमध्ये बर्फ पडतो; पण त्याच्या निर्मितीविषयी त्यांना ठाऊक नव्हते. भारतातील मूळ तंत्रज्ञान घेऊन युरोपमध्ये त्याच्यावर संशोधन केले.

भारताच्या प्राचीन काळापासूनच्या वैद्यकशास्त्र, खगोलभौतिकशास्त्र आणि वैदिक गणित यांच्या अध्यापनाचे पुरावे !

‘विल्यम अ‍ॅडन्स’ याने वर्ष १८२० च्या सर्वेक्षण अहवालात म्हटले, ‘येथे अनेक गावांत वैद्यकीय महाविद्यालयेे, २२ ते २५ सहस्र उच्चशिक्षण संस्था आहेत. खगोलभौतिकशास्त्र, वैदिक गणित शिकवले जाते. वैदिक गणितात चुका होत नाहीत.’

– स्व. राजीव दीक्षित

सहस्रावधी वर्षांपासून वातावरणाचा कोणताही परिणाम न झालेला देहलीतील लोखंडाचा ‘गरुड स्तंभ’ !

देहलीच्या कुतूबमिनार परिसरात शुद्ध लोखंडाचा एक स्तंभ चंद्रगुप्त विक्रमादित्य (वर्ष ३७५-४१४) याच्या काळापासून उभा आहे. या स्तंभाला ‘गरुड स्तंभ’ही म्हणतात. आश्‍चर्याची गोष्ट म्हणजे तो सहस्र वर्षांपासून उन्हाळा, हिवाळा, पावसाळा झेलत उभा असूनही स्तंभ गंजलेला नाही.

– स्वदेशी चळवळीचे प्रणेते स्व. राजीव दीक्षित