मराठवाड्यातील लक्षवेधी निरीक्षण…
मी गेल्या काही दिवसांत मराठवाड्यातील ३ धर्मस्थळांना दर्शनासाठी भेटी दिल्या. यात नांदेड येथील तख्त सचखंड श्री हुजूर अबचलनगर साहिब गुरुद्वारा, याच जिल्ह्यातील माहूरगडावरील रेणुकादेवी आणि हिंगोली जिल्ह्यातील औंढा नागनाथ येथील ज्योतिर्लिंग (एकूण १२ ज्योतिर्लिंगांच्या सूचीतील ८ वे) ही धर्मस्थळे होती. या तीनही स्थानांसह तेलंगाणामधील श्री ज्ञान सरस्वती मंदिरात (निर्मल जिल्हा) येथेही जाऊन देवी सरस्वती, महालक्ष्मी आणि महाकाली यांच्या दर्शनासह लहान मुलांवर शिक्षणाचा संस्कार करणारा ‘अक्षरा अब्यासम’ हा विधीसुद्धा पाहून आलो.
वरील चारही स्थाने देहलीतील मोगल बादशाह औरंगजेब (महंमद मुइउद्दीन) आणि भाग्यनगरमधील निजामशाहीच्या काळाच्याही अगोदरपासून अस्तित्वात होती. मोगल बादशहांनी भारतावर जवळपास ३३१ (१५२६ ते १८५७) वर्षे राज्य केले. या मोगल बादशहांच्या सूचीत औरंगजेब हा ‘हिंदुद्वेष्टा’ आणि ‘मंदिरांचा विध्वंसक’ म्हणून कुख्यात आहेच. स्वतःच्या भावांना कपटाने ठार मारून आणि जन्मदात्या बापाला कारागृहात डांबून बादशाह पदी विराजमान होणार्या औरंगजेबाने स्वत:ला ‘आलमगीर’, म्हणजे ‘जगज्जेता’ अन् ‘गाझी’, म्हणजे ‘धर्मयोद्धा’ घोषित करून घेतले होते. सुन्नी धर्माचा प्रसार करण्यास तो कटिबद्ध होता. हिंदुस्थान या ‘दार उल हरब’, म्हणजे इस्लामी राजवट नसलेल्या देशाला ‘दार उल इस्लाम’ (इस्लामचे राज्य असलेला प्रदेश) बनवणे, हे त्याने ‘फर्जे ऐन’, म्हणजे ‘अटळ धार्मिक कर्तव्य’ मानले होते. यासाठी त्याने ‘मुहनासीब’ हे धर्माधिकारी नेमले होते.

१. मोगलशासक औरंगजेब आणि निजामशासक मुबाजीरखान यांनी हिंदूंना दिलेले त्रास
औरंगजेबने मंदिरे पाडण्याचा फतवा वर्ष १६६९ मध्ये काढला होता. त्यानंतर वर्ष १६७९ मध्ये त्यानेच हिंदूंवर जिझिया कर पुन्हा लादला. जिझिया कर, म्हणजे इस्लामी राज्याने इस्लामेतर एकेश्वर धार्मिक लोकांवर लावलेला कर. इस्लामी राज्यांत ख्रिस्ती किंवा ज्यू लोक हा कर देऊन जिवंत राहू शकत. मूर्तीपूजक, अनेक ईश्वर धर्मीय लोक हा कर भरूनही जिवंत राहू शकत नसत. याचाच अर्थ औरंगजेबच्या काळात हिंदू आणि त्यांची मंदिरे ही काफिर (अल्लाहला न मानणारे) समूह अन् त्यांची श्रद्धास्थाने होती.
औरंगजेबाच्या मृत्यूनंतर १७ वर्षांनी, म्हणजे वर्ष १७२४ मध्ये मुबाजीरखान याने मोगल सैन्याचा पराभव करून स्वतःला ‘निजाम उल मुल्क असफजहा’ असे म्हणून घेतले. त्याने हैद्राबाद (भाग्यनगर) राज्याची स्थापना केली. या राज्याचा विस्तार आंध्रप्रदेश, कर्नाटक आणि महाराष्ट्र या राज्यांच्या काही भागात होता. याच निजामशाहीतील मीर मेहबूब अलीखानने हिंदूंना विविध पद्धतीने त्रास दिला. या निजामानेही हिंदु सण – उत्सव साजरे करण्यावर बंधने घातली. मंदिरातील आरती आणि मंगलवाद्यांचा आवाज बाहेर जाऊ नये, ही अट होती. पूजापाठ आणि दसरा घरातचा साजरा करावा, अशी सक्ती होती. जेथे मुसलमान वसाहत अधिक प्रमाणात होती, तेथे मंदिर दुरुस्तीला अनुमती नव्हती. इस्लाम समर्थनाचे एकतर्फी नियम पालनासाठी आणि इतर धर्मियांवर अन्याय करण्यासाठी निजामाने सशस्त्र दल ‘रझाकार’ नावाने सिद्ध केले होते.
…तर हिरवा चुडा भरलेला हात धरूनच माझी विटंबना होऊ शकते !

महाराष्ट्रात काही ठिकाणी दर्ग्याजवळ यात्रा, जत्रा भरतात. त्याच्याशी संबंधित काही अनुभव आधारित निरीक्षणे आहेत. ती अशी –
१. हिंदूंच्या घरात दर्ग्यावरील श्रद्धेतून पीर – फकीरचे छायाचित्र लावलेले दिसते. खरेतर मुसलमान व्यक्ती घरात किंवा दुकानात कधीही हिंदु देवतांची चित्रे लावत नाही.
२. दर्ग्याजवळच्या यात्रेत मुसलमानांची सर्वाधिक दुकाने असतात. तेथे हिंदूंची दुकाने अल्प असतात.
३. हिंदु विक्रेता असलेल्या दुकानातून मुसलमान महिला विश्वासाने खरेदी करतांना दिसत नाहीत. याउलट मुसलमान विक्रेत्याकडून हिरवा चुडा भरून घेतांना, गळ्यातील मंगळसूत्रात काळे मणी ओवून घेतांना हिंदू महिला हा विचार करत नाही, ‘जर दंगा झालाच, तर हिरवा चुडा भरलेला हात धरूनच माझी विटंबना होऊ शकते किंवा ज्या सौभाग्याचे मणी मंगळसूत्र गुंफले, त्याला दंग्यात ठरवून मारले जाऊ शकते !’
– श्री. दिलीप तिवारी
२. भारतातील धर्मांध मुसलमान इस्लामच्या शिकवणीनुसार हिंसक
मोगल आणि निजाम यांच्या काळात मराठवाड्यातील हिंदूंनी अनेक प्रकारे अन्यायाचे प्रकार सहन केले. अनेक मंदिरे उध्वस्त झाली. औरंगजेबच्या काळात औंढा नागनाथ येथील मंदिर उध्वस्त करण्यात आले होते. नंतर त्याची पुनर्बांधणी पुण्यश्लोक राजमाता अहिल्याबाई होळकर यांनी केली. औरंगजेब आणि निजाम यांच्या काळात भारतातील धर्मांध मुसलमान हे अल्लाह अन् त्यांच्या प्रेषितांवरील श्रद्धेपोटी हिंसक होत गेले. इस्लामच्या शिकवणीनुसार ‘काफिर’ संपवायचा प्रयत्न मुसलमान समाज करू लागला.
नंतरच्या काळात मुसलमान हिंदूंशी कसे वागले ? याच्या काही नोंदी पुढीलप्रमाणे –
अ. २ ऑक्टोबर १९२८ या दिवशी नांदेड येथे अनंत चतुर्दशीच्या दिवशी निघालेल्या मिरवणुकीवर मुसलमानांकडून आक्रमण झाले. मोठी दंगल उसळली.
आ. १६ ऑक्टोबर १९२८ या दिवशी आष्टी (जिल्हा बीड) येथील गणपतीची मूर्ती भंग केल्यामुळे तिथे दंगा झाला.
इ. २० मे १९२९ या दिवशी नांदेड येथे काही मुसलमान हे बकरी ईदचा नमाज पढून परत जात होते. हे लोक घोड्यावर आणि उंटावर आरूढ झालेले होते. गुरुद्वारासमोरून जातांना शिखांनी या मुसलमानांना उंट – घोड्यावरून खाली उतरायची विनंती केली; पण त्यांनी नकार दिला आणि मोठी दंगल उसळली.
ई. १३ ऑगस्ट १९२९ या दिवशी गणेशमूर्ती विसर्जन मिरवणुकीत वाद्य वाजवण्यावर निर्बंध आले. वर्ष १९३१ मध्ये परभणी आणि वर्ष १९३२ मध्ये पूर्णा (जिल्हा परभणी) या ठिकाणी गणेशमूर्ती मिरवणुकीस अडथळे आणल्यामुळे जातीय दंगली झाल्या.
उ. वर्ष १९३६ मध्ये नांदेड येथे हिंदु आणि मुसलमान यांच्यात जातीय दंगल झाली. शिखांच्या मालकीच्या एका टेकडीवर मुसलमानांनी जनाजा दफन केला होता. ती टेकडी शिखांचे श्रद्धास्थान होती.
३. इस्लामच्या शिकवणीच्या विरोधात मुसलमानांनी हिंदु मंदिरे आणि गुरुद्वारा यांच्या ठिकाणी व्यवसाय करणे अनाकलनीय !
वरील सर्व इतिहास मुद्दाम उगाळला आहे; कारण औरंगजेब, निजाम यांनी भारतातील शेकडो मंदिरे तोडली, फोडली. काही ठिकाणी मंदिर तोडून मशीद बनवली. काही ठिकाणी जागा बळकावल्या. आजही मुसलमान बादशाह वा त्यांच्या वारसांच्या भूमी कह्यात घेणारी वक्फ बोर्ड यंत्रणा आहेच; पण माझा मुद्दा वेगळाच आहे. मंदिरे ही काफिरांची धर्मस्थळे, काफिर म्हणजे मूर्ती – चिन्ह पूजक. अशा काफिरांच्या नावाने वा हाताने काही खाऊ – पिऊ नये, त्यांच्या देवतांची पूजा न करता ती लगेच उध्वस्त करा, ही खर्या इस्लामची शिकवण. याच शिकवणीचा प्रभाव सामान्य मुसलमानांवर आहे. ‘अल्ला’ समोर त्यांना जन्मभूमी, माता – पिताही पूज्य म्हणून मान्य नाही. अशा कट्टर, धर्माभिमानी मुसलमान हे समाजातील हिंदु मंदिरे आणि गुरुद्वारा यांच्याभोवती आज पोटार्थी म्हणून व्यवसाय वा धंदा करत आहेत.
औंढा नागनाथ येथे फुलांच्या दुकानापासून कुंकू, हळद अशी शृंगार साधने; भांडी, बांगड्या विक्रीची दुकाने मुसलमानांची आहेत. तेथील ५० टक्के बाजारपेठ मुसलमान विक्रेते वा धंदेवाईक यांच्या कह्यात आहेत. त्यांच्या दुकानात हिंदूंचे देवादिक दिसत नाहीत; पण काफिर श्रद्धाळूंचा पैसा पोटासाठी चालतो. काफिरकडून मिळवलेला पैसा पवित्र करायला प्रतिवर्षी रमजान महिन्यात ‘जकात’ देणे-घेणे ही परंपरा आहे. हिंदूंना धंदा करायची लाज वाटते; पण आजचा मुसलमान मिळेल ते काम करतांना दिसत आहे. नांदेड येथे गुरुद्वारात दुरुस्तीचे काम चालू होते. तेथे १०० टक्के मुसलमान कारागीर आणि कामगार होते. काम करत असतांना भुकेच्या वेळी ते कारागीर आणि कामगार गुरुद्वाराच्या लंगरमध्ये जेवत होते. मकरसंक्रांतीच्या पूर्वसंध्येला मी नांदेडमधील वजीराबाद परिसरातील मार्केटमध्ये गेलो. तेथेही पूजापाठ, वाण सामान, कपडे, गरजेच्या वस्तू यांची ५० टक्क्यांहून अधिक बाजार मुसलमान विक्रेत्यांच्या कह्यात आहे. रस्त्यावरील ७० टक्के विक्रेते मुसलमान आहेत.
४. सनातन संस्था, बजरंग दल या हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे न ऐकणारे अन् मुसलमानांना आर्थिक पाठबळ देत आत्मघात करणारे हिंदू !
वरील निरीक्षणातून एक जाणवले, ‘हिंदूंच्या प्रचार-प्रसारासाठी सनातन संस्था, बजरंग दल अशा मोजक्या संघटना या एकांगी प्रचार-प्रसार करत आहेत; पण हिंदूंनी त्यांचे न ऐकता बाजारपेठेमध्ये मुसलमान तरुणांचा जम बसत चालला आहे. जमेल ते काम मुसलमान युवक करत आहेत. वक्फ बोर्ड अनेक जागांच्या मालकीचे वारसा दाखले दाखवत तेथे कब्जा करू पहात आहे. पूर्वापार वहिवाट असलेल्या मंदिरांची जागा परत देण्याची त्यांची भूमिका नाहीच; पण हिंदु महिला-पुरुष सहिष्णुतेचा धर्म पाळून श्रद्धेच्या ठिकाणी मुसलमान विक्रेत्यांकडून खरेदी करत त्यांना आर्थिक पाठबळ देत आहेत. अशी रोजीरोटी ‘अल्लाह’ची देणगी म्हणायचे ? कि ‘ईश्वर’ने केलेल्या मेहरबानीचा आशीर्वाद मानायचे ? हिंदूंनी हे लक्षात ठेवायला हवे, ‘औरंगजेब – निजामाने मंदिरे तोडली आणि मंदिरांनी मुसलमानांना रोजगार दिला…!’
– श्री. दिलीप तिवारी, जळगाव. (१८.१.२०२५)