घडलेल्या प्रकाराची वाच्यता न करण्यास सांगणारी प्राध्यापिका अटकेत !
दिवा (जिल्हा ठाणे) – येथील शाळेमध्ये १० वर्षीय मुलीचा विनयभंग करण्यात आला. या प्रकरणी मुंब्रा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पोलीस मुख्य आरोपीचा शोध घेत आहेत. पीडित मुलीने शाळेच्या प्राध्यापिकेला गैरप्रकारांची माहिती दिली होती; परंतु तिने मुलीला ‘याविषयी घरी सांगू नकोस’, असे बजावले होते. त्यामुळे पोलिसांनी प्राध्यापिकेला अटक केली आहे.
संपादकीय भूमिकाअशांवर कठोर कारवाई व्हायला हवी ! |