बदायू (उत्तरप्रदेश) येथील जामा मशिदीच्‍या ठिकाणी होते नीलकंठ महादेव मंदिर !

दिवाणी न्‍यायालयात चालू आहे खटला

बदायू (उत्तरप्रदेश) येथील जामा मशीद

बदायू (उत्तरप्रदेश) – येथील जामा मशीद पूर्वीचे नीलकंठ महादेव मंदिर होते. या संदर्भात येथील दिवाणी न्‍यायालयातील वरिष्‍ठ विभागीय जलद गती न्‍यायालयात हिंदु महासभेकडून वर्ष २०२२ मध्‍ये याचिका प्रविष्‍ट (दाखल) करण्‍यात आली आहे. यावर ३० नोव्‍हेंबरला जामा मशीद समितीकडून न्‍यायालयात बाजू मांडण्‍यात आली. आता ३ डिसेंबर पुढील सुनावणी होणार आहे.

१. जामा मशिदीचे अधिवक्‍ता अन्‍वर आलम म्‍हणाले की, आम्‍ही न्‍यायालयात म्‍हटले की, जामा मशिदीत कोणतेही मंदिर नाही. हिंदु महासभेला खटला प्रविष्‍ट करण्‍याचा मुळातच अधिकार नाही. त्‍यांचा दावा आहे की, येथे मंदिर पाडून मशीद बांधण्‍यात आली आहे. ही मशीद ८५० वर्षे जुनी आहे, अर्थात् तिथे मंदिर अस्‍तित्‍वात नाही.

२. हिंदु महासभेचे अधिवक्‍ता विवेक रांदेर म्‍हणाले की, आम्‍ही नीलकंठ महादेव मंदिरात पूजा करण्‍याची अनुमती मिळावी, यासाठी याचिका प्रविष्‍ट केली आहे. या प्रकरणाची सुनावणी व्‍हावी कि नाही यावर वाद चालू आहे. सरकारी अधिवक्‍त्‍यांचा युक्‍तीवाद पूर्ण झाला आहे. मुसलमानांनी त्‍यांची बाजू मांडली आहे. चर्चा संपलेली नाही. पुढील तारीख ३ डिसेंबर आहे. मुसलमानांची चर्चा संपल्‍यानंतर आम्‍ही सविस्‍तर उत्तर देऊ.

३. याचिकाकर्ते आणि हिंदु महासभेचे राज्‍य संयोजक मुकेश पटेल म्‍हणाले की, आम्‍ही संपूर्ण पुराव्‍यांसह न्‍यायालयात दावा केला आहे. आम्‍हाला आशा आहे की, सत्र न्‍यायालयासह उच्‍च न्‍यायालय आणि सर्वोच्‍च न्‍यायालय यांच्‍याकडून आम्‍हाला न्‍याय मिळेल.

संपादकीय भूमिका

मुसलमान आक्रमणकर्त्‍यांनी मंदिरे पाडून तेथील परिसर मशिदींमध्‍ये रूपांतरित केल्‍याचे अनेक पुरावे आहेत. त्‍यामुळे आता केंद्र सरकारनेच भारतातील अशा सर्व स्‍थळांचे सर्वेक्षण करण्‍याची अनुमती देऊन हिंदूंना न्‍याय मिळवून द्यावा, अशीच हिंदूंची अपेक्षा आहे !