मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते आणि माजी मंत्री बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणातील मारेकरी शिवकुमार याला १० नोव्हेंबर या दिवशी पोलिसांनी अटक केली. तो नेपाळला पळून जाण्याच्या प्रयत्नात होता. अनुराग कश्यप, ज्ञानप्रकाश त्रिपाठी, आकाश श्रीवास्तव आणि अखिलेशेंद्र प्रताप सिंह यांनाही शिवकुमारला आश्रय देणे आणि नेपाळला पळून जाण्यास साहाय्य करणे या गुन्ह्यांत अटक करण्यात आली आहे.
शिवकुमार हा बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणातील मुख्य मारेकरी आहे. तो लॉरेन्स गँग सिंडिकेटच्या संपर्कात होता.