पत्नी वैवाहिक बलात्काराच्या प्रस्तावित कायद्याचा अपलाभ घेतील, अशी भीती !
नवी देहली – येथील जवाहरलाल नेहरू स्टेडियमच्या बाहेर एक वेगळेच आंदोलन झाले. पत्नीकडून अत्याचार करण्यात आलेल्या पतींने हे आंदोलन केले होते. यामध्ये अनुमाने ७५ लोक सहभागी झाले होते. या आंदोलकांनी वैवाहिक बलात्काराच्या संदर्भात प्रस्तावित कायद्याला विरोधही केला. जर हे विधयेक संमत झाले, तर घरात रहाणार्या पुरुषांवर बलात्काराचे आरोप लावून त्यांना कारागृहात जावे लागू शकते, अशी भीती आंदोलकांनी या वेळी व्यक्त केली.
आंदोलन करणारे कोण होते ?
१. कोणत्या न कोणत्या प्रकरणात पत्नीने छळ केलेले !
२. पत्नीमुळे अनेक वर्षे स्वत:च्या मुलांनाही भेटू न शकलेले !
३. पत्नीने घराबाहेर काढल्यामुळे स्वत:चे घर असतांनाही भाड्याच्या घरात रहाण्याची नामुष्की ओढवलेले !
अशा दिल्या गेल्या घोषणा !
१. ‘शादी के खेल में, पती जाएगा जेल में’
२. ‘बीवी करे तो प्यार, पती करे तो बलात्कार’
३. ‘पत्नी के प्यार में, पती गया तिहाड में’ (देहलीतील कारागृहाचे नाव ‘तिहाड’ आहे.)
संपादकीय भूमिकासमाजाची नीतीमत्ता आणि वैचारिक पातळी कोणत्या थराला गेली आहे, हे सांगण्यासाठी हे उदाहरण पुरेसे नाही का ? |